FC Goa beat Punjab FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

FC Goa beat Punjab FC: एफसी गोवाने धारदार खेळाची मालिका कायम राखताना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील विजयी धडाका बुधवारीही कायम राखला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाने धारदार खेळाची मालिका कायम राखताना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील विजयी धडाका बुधवारीही कायम राखला. एका गोलच्या पिछाडीवरून त्यांनी चुरशीच्या लढतीत पंजाब एफसीला २-१ गोलफरकाने दणका दिला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यामुळे यजमान संघाने गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

मागील लढतीत बंगळूर एफसीची अपराजित घोडदौड खंडित केलेल्या एफसी गोवाने बुधवारी पंजाब एफसीला सलग तीन विजयानंतर पराभव पत्करण्यास भाग पाडले. आता दोन्ही संघांचे प्रत्येकी १२ गुण झाले आहेत, मात्र चांगल्या कामगिरीमुळे एफसी गोवा तिसऱ्या, तर पंजाब एफसी चौथ्या क्रमांकावर आहे. एफसी गोवाचा हा आठ सामन्यांतील तिसरा विजय असून पंजाब एफसीला सहाव्या लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागला.

बोस्नियन आघाडीपटू अस्मिर सुलिच याने पंजाब एफसीला १३व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. २२व्या मिनिटास अल्बानियाच्या आर्मांदो सादिकूच्या स्पर्धेतील आठव्या गोलमुळे एफसी गोवाने बरोबरी साधली. या गोलमध्ये साह्य केलेल्या स्पॅनिश इकेर ग्वॉर्रोचेना याने ४९व्या मिनिटास एफसी गोवास आघाडीवर नेले. देयान द्राझिच याचा फटका अडविल्यानंतर रिबाऊंडवर ग्वॉर्रोचेना याने केलेला हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला. दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या इकेरचा हा मोसमातील पहिलाच गोल ठरला. त्याला ६६व्या मिनिटास सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल करण्याची सुरेख संधी होती, मात्र ताकदवान फटका गोलपोस्टला आपटल्यामुळे पंजाब एफसी संघ बचावला आणि एफसी गोवाची आघाडी वाढू शकली नाही.

गोलरक्षक ह्रतीक तिवारी याची दक्ष कामगिरी एफसी गोवाच्या विजयावर उल्लेखनीय ठरला. त्याने पूर्वार्धात लुका मॅसेन याला धोकादायक फटका वेळीच रोखल्यामुळे यजमान संघाचे नुकसान टळले. सामन्याच्या भरपाई वेळेत मुशागा बाकेंगा याचा धोकादायक प्रयत्न बचावपटू संदेश झिंगन याने वेळीच उधळून लावल्यामुळे एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली.

एफसी गोवाचा पंजाब एफसीविरुद्ध फातार्ड्यात सलग दुसरा विजय

गतमोसमात २ ऑक्टोबर २०२३ रोजी याच मैदानावर एफसी गोवा १-० फरकाने विजयी

यंदा फातोर्ड्यातील ५ सामन्यांत एफसी गोवाचे २ विजय, १ बरोबरी व २ पराभव

एफसी गोवाच्या आर्मांदो सादिकूचे ७ सामन्यांत ८ गोल

२०२२-२३ मोसमात एफसी गोवातर्फे ११ गोल केलेल्या इकेर ग्वॉर्रोचेनाचा यंदा पहिलाच गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

Yuri Alemao: तरुणांना प्रोत्साहन देण्यात कला, संस्कृती खातं अपयशी; युरी आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT