fc goa dainik gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League: एफसी गोवाची मार्केझना विजयी ‘भेट’; हैदराबाद एफसीची दाणादाण उडवत नोंदवला सलग चौथा विजय!

FC Goa beat Hyderabad FC: एफसी गोवाने सलग चौथा सामना जिंकून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शंभराव्या सामन्यात मार्गदर्शन करणारे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना छान विजयी भेट दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाने सलग चौथा सामना जिंकून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शंभराव्या सामन्यात मार्गदर्शन करणारे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना छान विजयी भेट दिली. बुधवारी त्यांनी हैदराबाद एफसीला २-० फरकाने नमविले. हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर सामना झाला.

स्पेनचे मार्केझ हे हैदराबादचे माजी प्रशिक्षक आहेत. पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध त्यांनी प्रशिक्षक या नात्याने आयएसएल कारकिर्दीतील पन्नासावा सामनाही जिंकला. आयएसएल स्पर्धेत शंभर सामने मार्गदर्शन करणारे ते अवघे तिसरे प्रशिक्षक ठरले. उदांता सिंग याने ३३व्या आणि स्पॅनिश इकेर ग्वॉर्रोचेना याने ४४व्या मिनिटास नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे एफसी गोवाने स्पर्धेतील एकंदरीत पाचवा विजय नोंदविताना दहा सामन्यांतून गुणसंख्या १८ वर नेली.

अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी असलेल्या मोहन बागान व बंगळूर एफसी यांचे समान २० गुण आहेत. एफसी गोवाचा (FC Goa) पुढील सामना १४ डिसेंबर रोजी बंगळूर येथे बंगळूर एफसीविरुद्ध होईल. हैदराबाद एफसीला स्पर्धेत सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दहा लढतीनंतर त्यांचे सात गुण आणि अकरावा क्रमांक कायम राहिला.

प्रतिहल्ल्यावर महंमद यासिर याने दिलेल्या लाँग पासवर उदांता याने चेंडूवर ताबा राखला, फटक्यासाठी योग्य स्थिती साधून त्याने अप्रतिम फटका मारला. यावेळी हैदराबादचा गोलरक्षक लालबियाख्लुआ जोंगटे याला चेंडू अडविण्याची संधीच मिळाली नाही. अकरा मिनिटानंतर आर्मांदो सादिकूच्या असिस्टवर ग्वॉर्रोचेना याने मारलेला फटका हैदराबादचा बचावपटू स्टेफन सॅपिच याला आपटला आणि गोलरक्षक जोंगटे याचा अंदाज चुकल्यामुळे एफसी गोवाच्या खाती दुसऱ्या गोलची नोंद झाली.

गोलरक्षक ह्रतीक अफलातून

उत्तरार्धात हैदराबादने आक्रमणाची धार वाढविली. बदली खेळाडू सोयाल जॉशी मैदानात उतरल्यानंतर एफसी गोवाच्या बचावफळीवर दडपण वाढले. मात्र संदेश झिंगन, ओडेई ओनाइंडिया, जय गुप्ता यांनी हैदराबादला रोखून धरले, तसेच गोलरक्षक ह्रतीक तिवारी यांची दक्षताही अफलातून ठरली. त्यामुळे हैदराबादला सनसनाटी निकाल नोंदविणे शक्य झाले नाही. ह्रतीकची भक्कम कामगिरी एफसी गोवासाठी निर्णायक ठरली आणि संघाने मोसमातील तिसरी क्लीन शीट राखली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT