पणजी: एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटातील अखेरच्या सामन्यातील पराभवासह एफसी गोवाचे फुटबॉल मैदानावरील २०२५ वर्ष संपले. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला सर्व सहाही सामन्यांत हार पत्करावी लागली. आता ते २०२६ मध्ये स्पर्धात्मक लढती कधी खेळणार याची स्पष्टता नाही.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी रात्री ताजिकिस्तानच्या एफसी इस्तिक्लोल संघाविरुद्ध लढतीच्या प्रारंभी एफसी गोवा संघाच्या मैदानावरील प्रतिकात्मक कृती भारतीय फुटबॉलमधील सध्याची अनिश्चितता स्पष्ट करणारी ठरली. या कृतीने भारतीय फुटबॉलकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या संविधानातील तांत्रिक अटी आणि व्यावसायिक कराराविना अजूनही इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही देशातील प्रमुख स्पर्धा कधी सुरू होणार याची शाश्वती नाही.
आयएसएल स्पर्धा या मोसमात (२०२५-२६) झाली नाही, तर एफसी गोवास २०२६-२७ मधील एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत खेळणेही कठीण ठरेल. कारण, आयएसएल स्पर्धा झाली नाही, तर आशियातील क्लब फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी आवश्यक सामन्यांचा (किमान २४) निकष एफसी गोवास गाठता येणार नाही. सलग दुसऱ्यांदा सुपर कप जिंकून एफसी गोवाने पुढील मोसमातील एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्ले-ऑफसाठी पात्रता मिळविली आहे; पण या स्पर्धेत खेळणे निश्चित नाही. यंदा मोसमात एफसी गोवा (FC Goa) संघ देशांतर्गत फुटबॉलमध्ये आतापर्यंत सुपर कप स्पर्धेतील पाच सामनेच खेळला आहे. भारतीय फुटबॉलमधील सध्याच्या गोंधळाच्या वातावरणात देशातील, तसेच संबंधित संघांकडून खेळणाऱ्या परदेशी फुटबॉलपटूंचेही भवितव्य अधांतरी आहे.
‘स्पर्धेतील संघाच्या कामगिरीबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. अशा दर्जाच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणे हेच एक सन्मानाचे आहे आणि अशा पातळीवरील सामने सातत्याने खेळणे हे प्रत्येक भारतीय संघाचे (Team India) उद्दिष्ट असले पाहिजे. आमच्या मोहिमेत नक्कीच अधिक काहीतरी मिळायला हवे होते, तरीही शून्य गुणांसह स्पर्धेची सांगता करावी लागली याचीच खंत आहे.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.