AFC League 2025: वर्षातील अखेरचा सामना खेळणार FC Goa! सकारात्मक समारोपासाठी इच्छुक; ‘इस्तिक्लोल’चे आव्हान

FC Goa Vs Istiqlol: एफसी गोवा व ताजिकिस्तानमधील एफसी इस्तिक्लोल यांच्यातील सामना बुधवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.
fc goa
fc goa Dainik Gomantak
Published on
Updated on

AFC League 2025 : एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत अगोदरचे पाचही सामने गमावलेला एफसी गोवा संघ बुधवारी (ता. २४) ‘ड’ गटातील अखेरच्या औपचारिक सामन्यात खेळणार आहे, तरीही आपला संघ भारतीय फुटबॉलसाठी खूपच कठीण ठरलेल्या वर्षाची अखेर सकारात्मक करेल, अशी ग्वाही मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मंगळवारी दिली.

एफसी गोवा व ताजिकिस्तानमधील एफसी इस्तिक्लोल यांच्यातील सामना बुधवारी रात्री फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. २०२५ वर्षातील एफसी गोवाचा हा अखेरचा सामना आहे.

भारतातील देशांतर्गत व्यावसायिक फुटबॉल सध्या ठप्प असल्याने एफसी गोवा नववर्षात मैदानात कधी उतरणार याची स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी स्पेनला जाण्यापूर्वी मार्केझ आपल्या संघाकडून विजयी कामगिरीची अपेक्षा बाळगून आहेत.

fc goa
Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

ड गटात सर्व पाचही सामने जिंकून सौदी अरेबियाच्या अल नस्सर क्लबने १५ गुणांसह राऊंड ऑफ १६ फेरीतील जागा पक्की केली आहे. इराकच्या अल झावरा क्लबचे नऊ गुण आहेत. एफसी इस्तिक्लोलचे सहा गुण असून एफसी गोवा संघाला अजून गुणखाते उघडता आलेले नाही.

fc goa
Super Cup 2025 Final: फातोर्ड्यात रंगणार महामुकाबला! FC गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान; सलग दुसऱ्यांदा सुपर कप राखण्याची संधी

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हिसॉर येथे १ ऑक्टोबर रोजी एफसी इस्तिक्लोलने एफसी गोवास २-० फरकाने नमविले होते. फातोर्ड्यात या स्पर्धेतील मागील सामन्यात पराभूत होण्यापूर्वी एफसी गोवाने बलाढ्य अल नस्सर संघाला २-१ असे झुंजविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com