Cristiano Ronaldo Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ronaldo Goa Visit: 'रोनाल्डो' गोवा दौऱ्यावर येणार का? माहिती अजूनही गुप्त; आगमनाबाबत साशंकता

Cristiano Ronaldo Goa Visit: रोनाल्डो याची नियोजित ‘गोवा भेट’ अद्यापही अधांतरी आहे. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने तयारी करणाऱ्या गोवा पोलिसांनाही त्याच्या आगमनाबाबत स्पष्टता नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याची नियोजित ‘गोवा भेट’ अद्यापही अधांतरी आहे. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने तयारी करणाऱ्या गोवा पोलिसांनाही त्याच्या आगमनाबाबत स्पष्टता नाही.

एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या सौदी अरेबियातील अल नासर क्लब संघाशी पोर्तुगीज फुटबॉलपटू रोनाल्डो करारबद्ध आहे. तो या संघाचा कर्णधारही आहे. अल नासर क्लबचा ‘अवे’ सामना २२ ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवाविरुद्ध खेळला जाईल. या लढतीत रोनाल्डो खेळण्याबाबत सध्या अस्पष्टता असली, तरी देशभरातील फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पाचवेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेला ४० वर् ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर क्लबच्या मागील दोन्ही सामन्यात खेळला नव्हता. ताजिकिस्तानच्या एफसी इस्तिक्लोल, तसेच इराकच्या अल झावरा क्लबविरुद्धच्या लढतीसाठी रोनाल्डो अल नासर क्लबच्या राखीव फळीतही नव्हता.

रोनाल्डो संघासोबत गोवा दौऱ्यावर येणार का याबाबत अल नासर क्लबने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र स्पर्धेसाठी नोंदणी झालेल्या खेळाडूंत त्याचे नाव आहे. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले, की “२२ ऑक्टोबरच्या सामन्यात रोनाल्डो हा खेळाडूंपैकी एक आहे, परंतु त्याच्या आगमनाबाबत आम्हाला अद्याप पुष्टी मिळालेली नाही.

तो आला तरी आम्ही योग्य सुरक्षेची तयारी केली आहे आणि पूर्ण सज्ज आहोत.” एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात आल्यास आणि सामन्यासाठी फातोर्डा येथील स्टेडियमवर दाखल झाल्यास मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक गर्दीची शक्यता लक्षात घेऊन, पोलिस व स्टेडियम प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजना तपासून पाहिल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT