India And England Dinik Gomantak
गोंयचें खेळामळ

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

AUS vs ENG: ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने यजमान इंग्लंडला 8 विकेट्सनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

Manish Jadhav

WTC Points Table 2025-27: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने यजमान इंग्लंडला 8 विकेट्सनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या पॉइंट टेबलमध्ये आपले अव्वल स्थान मजबूत केले, तर या पराभवामुळे इंग्लंडला मोठा फटका बसला.

WTC गुणतालिकेत इंग्लंडचे मोठे नुकसान

दरम्यान, या सामन्यातील पराभवाचा थेट परिणाम इंग्लंडच्या (England) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टक्केवारीत झाला. सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ WTC पॉइंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर होता आणि पराभवानंतरही तो याच क्रमांकावर कायम आहे. मात्र, त्यांची PCT (टक्केवारी) लक्षणीयरीत्या घसरली. पराभवापूर्वी इंग्लंडची PCT 43.33 होती, जी आता घसरुन 36.11 पर्यंत खाली आली. इंग्लंडने WTC च्या या चालू सायकलमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले असून, ज्यात दोन जिंकले आणि तीन गमावले.

ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने आपला अजेय प्रवास सुरु ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने (Australia) चालू WTC सायकलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले असून चारही सामन्यांमध्ये विजय नोंदवला. या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाची PCT सध्या 100 असून पॉइंट टेबलमध्ये तो पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर

त्याचवेळी, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 30 धावांनी गमावला, तर दुसरा सामना सध्या गुवाहाटी येथे सुरु आहे. WTC 2025-27 च्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने या सायकलमध्ये एकूण 8 सामने खेळले असून, त्यापैकी 4 जिंकले आणि 3 गमावले तर 1 सामना अनिर्णित राहिला. भारताची PCT 54.17 आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विजयाची कहाणी

पहिल्या ॲशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य ट्रॅव्हिस हेड याच्या 123 धावांच्या शानदार शतकी खेळीमुळे सहज पार केले. या सामन्यात गोलंदाजीत कमाल कामगिरी करत 10 विकेट्स घेणाऱ्या मिचेल स्टार्क याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. हा विजय ऑस्ट्रेलियासाठी फक्त मालिकेत आघाडी मिळवणारा नाही, तर WTC च्या अंतिम फेरीकडे एक मोठे पाऊल टाकणारा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्डचा नवा धमाका! रेट्रो डिझाईन आणि आधुनिक फीचर्सची कॉम्बो 'बुलेट 650'; गोव्यातील मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये सादर

SCROLL FOR NEXT