Durand Cup 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Durand Cup 2024: माजी विजेत्या एफसी गोवा संघाला धक्का! १-१ बरोबरीमुळे आव्हान साखळी फेरीतच आटोपले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाचे १३३व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील आव्हान फ गट साखळी फेरीतच आटोपले. अखेरच्या लढतीत त्यांना शिलाँग लाजाँग एफसीने १-१ असे गोलबरोबरीत रोखले, त्यामुळे माजी विजेत्यांना माघारी फिरावे लागले.

फ गटातील अखेरचा निर्णायक सामना शनिवारी शिलाँग येथे झाला. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी एफसी गोवाला विजय अत्यावश्यक होता, तर शिलाँग लाजाँगला बरोबरी पुरेशी होती. प्रत्येकी एक गुण मिळाल्यानंतर स्थानिक संघाने आगेकूच केली. प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर दोन्ही संघांनी दोन विजय व एका बरोबरीसह समान सात गुण नोंदविले. मात्र, गोलसरासरीत शिलाँग लाजाँगला (+३) गटात पहिला, तर एफसी गोवाला (+२) दुसरा क्रमांक मिळाला. त्यामुळे गोव्यातील संघाचे आव्हान संपुष्टात आले.

सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धात तीन मिनिटांच्या फरकाने झाले. मार्कोस रुडवेरे सिल्वा याने तिसाव्या मिनिटास शिलाँग लाजाँगला आघाडी मिळवून दिल्यानंतर लगेच ३३व्या मिनिटास देवेंद्र मुरगावकरने एफसी गोवास बरोबरी साधून दिली. २०२१ पासून ड्युरँड कप स्पर्धेतील देवेंद्रचा हा वैयक्तिक आठवा गोल ठरला असून एफसी गोवातर्फे स्पर्धेतील गोल उच्चांक आहे. बरोबरीनंतर गोव्यातील संघाने आघाडीसाठी आटोकाट प्रयत्न केल; पण त्यांना यश मिळाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Belagavi - Vasco Train: बेळगाव - वास्को इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करा; भाजप खासदाराची मागणी

Goa Cruise Terminal: गोव्यात होणार नवे क्रूझ टर्मिनल; ड्युटी फ्री शॉप, लाउंज, फूड कोर्ट सारख्या मिळणार सुविधा

गोव्यात चार दिवसांत सात जणांचा अपघाती मृत्यू; वाहतूक मंत्र्यांनी Engineer's वर फोडले खापर

कुणी पाणी देता का पाणी? हणजूण-कायसूव स्थानिक आक्रमक, PWD कार्यालयावर घागर मोर्चा

PM Modi Birthday: गोव्याच्या राज्यपालांकडून मोदींना अमूल्य बर्थडे गिफ्ट, प्राचीन वृक्षांचे केले जाणार जतन

SCROLL FOR NEXT