Goa Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: गोव्यातील क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी! देशांतर्गत स्पर्धांची मेजवानी; जाणून घ्या वेळापत्रक..

Goa Cricket Tournaments: २०२५-२६ मधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा वेळापत्रकानुसार गोव्यातील क्रिकेटमध्ये ऑक्टोबरपासून स्पर्धात्मक लगबग अनुभवायला मिळेल.

Sameer Panditrao

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या २०२५-२६ मधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा वेळापत्रकानुसार गोव्यातील क्रिकेटमध्ये ऑक्टोबरपासून स्पर्धात्मक लगबग अनुभवायला मिळेल.

सीनियर महिला टी-२० स्पर्धेने आठ ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रिकेट मोसम सुरू होईल. नऊ ऑक्टोबरपासून १९ वर्षांखालील पुरुष विनू मांकड करंडक एकदिवसीय स्पर्धा, १५ ऑक्टोबरपासून प्रतिष्ठेची रणजी करंडक, तर २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून खेळली जाईल.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे नियोजित वेळापत्रक : सीनियर पुरुष : रणजी करंडक : १५ ऑक्टोबरपासून, सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० : २६ नोव्हेंबरपासून, विजय हजारे करंडक एकदिवसीय : २४ डिसेंबरपासून.

ज्युनियर पुरुष : २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक : १६ ऑक्टोबरपासून, २३ वर्षांखालील स्टेट ए (एकदिवसीय) करंडक : ९ नोव्हेंबरपासून, १९ वर्षांखालील विनू मांकड करंडक एकदिवसीय : ९ ऑक्टोबरपासून, १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक : १६ नोव्हेंबरपासून,

१६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक : ७ डिसेंबरपासून.सीनियर महिला टी-२० करंडक : ८ ऑक्टोबरपासून, सीनियर महिला एकदिवसीय : ६ फेब्रुवारीपासून, २३ वर्षांखालील महिला टी-२० : २४ नोव्हेंबरपासून.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईक'सारख्या व्यक्तीकडे 8 कोटी रुपये सापडतात, याचा अर्थ काय?

Mangroves Goa: हुपळी 'खारफुटी'चे झाड म्हणजे एकेकाळी लोकदैवताचे नैसर्गिक मंदिर ठरले होते..

Shankasur Kala: शेकडो वर्षांची परंपरा असलेला ‘शंकासुर काला'! गोव्यातील प्राचीन परंपरा; स्थानिक लोककलेचा आविष्कार

Bethora: चिंताजनक! बेतोडा नाल्यामध्ये घातक रसायन; पाणी प्रदूषित, मासे आढळले मृतावस्थेत; दुर्गंधीसह रोगराईची भीती

Goa Live News: हडफडे दुर्घटनेवर बोलताना आमदार मायकल लोबो भावूक; डोळ्यात आले अश्रू

SCROLL FOR NEXT