Cricket Retirement: वयाच्या 29व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, रोहित-विराटनंतर विकेटकीपर बॅट्समनचा क्रिकेटप्रेमींना धक्का

Nicholas Pooran Retirement: भारताचे दोन महान फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशातच आता आणखी एका स्टार खेळाडूनं निवृत्तीची घोषणा केलीय.
Nicholas Pooran Retirement
Nicholas Pooran RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचे दोन महान फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हे दोन्ही महान फलंदाज आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ज्या प्रकारे त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे, आता एका २९ वर्षीय क्रिकेटपटूने क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे.

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला धक्का दिला. निकोलस पूरनने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली आणि त्याला 'खूप कठीण' निर्णय म्हटले.

निकोलस पूरनने वेस्ट इंडिजसाठी ६१ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि १०६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३६६८ धावा केल्या आहेत. निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३ शतके केली आहेत.

Nicholas Pooran Retirement
Goa Travel Guide: 'गोवा ट्रिप' प्लॅन करताय?काय खायचं? कुठं जायचं? स्थानिकांसोबत संवाद कसा साधायचा? वाचा संपूर्ण माहिती

निकोलस पूरनने अलीकडेच आयपीएल २०२५ संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या व्हाईट-बॉल मालिकेतून विश्रांती घेण्याची विनंती केली होती. काही दिवसांनीच निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निकोलस पूरन आयपीएल २०२५ मध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने १४ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ५२४ धावा केल्या.

निकोलस पूरनची निवृत्ती वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी मोठा धक्का आहे, कारण पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली २०२६ चा टी२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. तथापि, निकोलस पूरनने याची पर्वा केली नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निकोलस पूरनने वेस्ट इंडिजचे नेतृत्वही केले आहे.

निकोलस पूरनने २०१६ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. निकोलस पूरनने डिसेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

निकोलस पूरन हा आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने २१ कोटी रुपये देत कायम ठेवलं होतं.

Nicholas Pooran Retirement
Old Goa: जुने गोवे वारसा स्थळात इमारती नकोत! स्थानिकांची भूमिका; प्रस्तावित पोलिस स्थानक इमारतीला विरोध

निकोलस पूरन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, 'आपल्याला आवडणाऱ्या या खेळाने आपल्याला खूप काही दिले आहे आणि देत राहील. या खेळानं वेस्ट इंडिजच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणे हा एक सन्मान आहे जो मी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ ठेवेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com