Inter Kashi VS Dhempo Sports Club Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League 2024: घरच्या मैदानावर ‘धेंपो’समोर इंटर काशी संघाचे आव्हान; पंडित नेहरू स्टेडियमवर रंगणार सामना

Inter Kashi VS Dhempo Sports Club: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांच्यासमोर इंटर काशी संघ आणि धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात सामना रंगणार आहे.

Sameer Amunekar

I League 2025 Inter Kashi VS Dhempo Sports Club

पणजी : माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबची आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील यावेळची घरच्या मैदानावरील मोहीम शुक्रवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांच्यासमोर इंटर काशी संघाचे खडतर आव्हान असेल.

धेंपो क्लब यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील सहाही सामने अवे मैदानावर खेळला आहे. चर्चिल ब्रदर्सविरुद्धचा सामना राय पंचायत मैदानावर झाला, पण तो चर्चिल ब्रदर्ससाठी ‘घरचा’ सामना होता. त्या लढतीत धेंपो क्लबला २-० फरकाने पराभूत व्हावे लागले होते.

एकंदरीत सहा सामन्यांतून त्यांनी तीन विजय, एक बरोबरी व दोन पराभव या कामगिरीसह १० गुणांची कमाई केली आहे. इंटर काशी संघाने सहा सामन्यांतून तीन विजय, दोन बरोबरी व एका पराभवासह ११ गुण प्राप्त केले आहे. इंटर काशी संघाला एकमात्र पराभव चर्चिल ब्रदर्सविरुद्ध पत्करावा लागला होता.

धेंपो क्लबचा आय-लीग स्पर्धेतील अखेरचा सामना १८ डिसेंबर रोजी चर्चिल ब्रदर्सविरुद्ध झाला होता, तर २० डिसेंबर रोजी इंटर काशी संघाने श्रीनिदी डेक्कनला ३-१ फरकाने नमविले होते. विश्रांतीनंतर आता पुन्हा मैदानात उतरताना दोन्ही संघांची कसोटी लागेल.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर धेंपो क्लबचा इतिहास गौरवशाली आहे. याच मैदानावर त्यांनी २००७ साली एएफसी कपसाठी पात्रता मिळवून इतिहास रचला होता. २००४ साली याच स्टेडियमवर धेंपो क्लबने ईस्ट बंगालला नमवून फेडरेशन कपवर नाव कोरले होते.

धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक म्हणाले की, खेळाडू आव्हानासाठी सज्ज आहेत. आम्हाला अजून फार मोठी मजल गाठायची आहे. या कालावधीत कितीतरी चढउतार असतील. आम्ही प्रत्येक सामन्यागणिक आव्हान स्वीकारू. एकंदरीत आम्ही या लढतीसाठी तयार आहोत.

फातोर्ड्यात आम्हाला पुन्हा भक्कम किल्ला उभारायचा आहे, त्यासाठी चाहत्यांकडून ऊर्जा आणि पाठिंबा हवा आहे, असं मत प्रशिक्षक समीर नाईक व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT