Ranji Trophy 2025: गोव्याला वेध प्लेट करंडकाचे; अंतिम सामन्यात नागालँडचं असणार कडवं आवाहन

Goa vs Nagaland : गोवा आणि नागालँड यांच्यातील रणजी करंडक प्लेट विभागीय अंतिम सामना २३ जानेवारापूसन सोविमा येथील नागालँड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
Ranji Trophy 2025
Ranji Trophy 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाचा देशांतर्गत क्रिकेटमधील मोसम रणजी करंडक प्लेट विभागीय अंतिम लढतीने संपणार आहे. नागालँडविरुद्धचा सामना जिंकल्यास मोसमाची समाप्ती यशस्वी कामगिरीने करण्याची संधी संघाला मिळेल.

गोवा आणि नागालँड यांच्यातील रणजी करंडक प्लेट विभागीय अंतिम सामना २३ जानेवारापूसन सोविमा येथील नागालँड क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना पाच दिवसीय असल्याने दोन्ही संघांचा कस लागेल.

प्लेट गटात गोव्याने पाचही साखळी सामने जिंकून ३३ गुणांची कमाई केली होती, तर नागालँडने तीन विजय, एक पराभव व एक अनिर्णित कामगिरीसह २३ गुणांसह गटात दुसरा क्रमांक पटकावला.

Ranji Trophy 2025
Water Sports NOC: गोव्यात जलक्रीडा उपक्रमांना एनओसी आवश्‍यक; मंत्री खंवटेंनी केला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

गोवा आणि नागालँड हे दोन्ही संघ २०२५-२६ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट विभागात खेळण्यास पात्र ठरले आहेत. आता विजेतेपदाचा करंडक प्लेट गटातील वर्चस्वावर शिक्कामोर्तब करले. प्लेट विभागीय साखळी फेरीत गोव्याने नागालँडला ८३ धावांनी हरविले होते.

तेव्हा सामना पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत झाला होता. गोव्याचा संघ याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आणखी एका विजयासाठी प्रयत्नशील राहील. मात्र नागालँडला कमी लेखणे धोक्याचे ठरू शकते, कारण मागील लढतीत त्यांनी गोव्याला चांगलेच झुंजविले होते.

प्राप्त माहितीनुसार, रणजी प्लेट अंतिम लढतीपूर्वी गोव्याचे सराव शिबिर होणार आहे. नोव्हेंबरमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध अखेरचा रणजी साखळी सामना खेळल्यानंतर गोव्याचा संघ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळला.

आता पुन्हा रणजी सामना खेळायचा असल्याने संभाव्य संघाचे शिबिर १५ जानेवारीपासून सुरू होण्याचे संकेत आहेत.

Ranji Trophy 2025
Goa Sports: फुटबॉलमध्ये 'ख़ुशी', क्रिकेटमध्ये 'गम'; कसे राहिले गोव्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी वर्ष जाणून घ्या

रणजी करंडक प्लेट स्पर्धेत ५ सामने, ५ विजय, ३३ गुण, पहिला क्रमांक

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत ६ सामने, २ विजय, ४ पराभव, ८ गुण

विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) स्पर्धेत ७ सामने, ३ विजय, ४ पराभव १२ गुण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com