Dempo SC vs Sreenidi Deccan Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Dempo SC vs Sreenidi Deccan: धेंपो क्लबला अखेर बरोबरीचे समाधान, आयएफएल लढतीत श्रीनिदी डेक्कन संघाने 1-1 असे रोखले

Indian Football League Fatorda Stadium Match: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेतील यंदाची मोहीम संपवताना धेंपो स्पोर्टस क्लबला बरोबरीचे समाधान लाभले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेतील यंदाची मोहीम संपवताना धेंपो स्पोर्टस क्लबला बरोबरीचे समाधान लाभले. श्रीनिदी डेक्कन संघाने त्यांना १-१ असे गोलबरोबरीत रोखले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

त्रिनिदाद-टोबॅगोचा मार्कुस जोसेफ याने सहाव्याच मिनिटास धेंपो क्लबला आघाडी मिळवून दिली. आर्नोल्ड ऑलिव्हेराच्या कॉर्नर किकवर त्याचे हेडिंग भेदक ठरला. त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक नववा गोल ठरला. मार्कुसने स्पर्धेत सर्वाधिक गोल केले असून डायमंड हार्बर एफसीचा ह्युगो डियाझ रॉड्रिगेझ आठ गोलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सामन्याच्या ७१व्या मिनिटास हादी इद्रिसोऊ याच्या गोलमुळे श्रीनिदी डेक्कनने बरोबरी साधली. धेंपो क्लबचा गोलरक्षक आशिष सिबी सामन्याचा मानकरी ठरला.

धेंपो क्लबचे १४ लढतीतून १५ गुण झाले, त्यांना सहा संघांच्या विजेतेपद फेरीत पाचवा क्रमांक मिळाला. तीन विजय, सहा बरोबरी व पाच विजय अशी कामगिरी त्यांनी नोंदविली. चानमारी एफसीचेही १५ गुण झाले, पण धेंपो क्लबची गोलसरासरी सरस ठरली.

श्रीनिदी डेक्कन आता २६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. १४ लढतीत त्यांनी सात विजय, पाच बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी केली. आयएफएल स्पर्धेतील अखेरचा सामना शनिवारी (ता. २३) विजेता डायमंड हार्बर एफसी (२९ गुण) व शिलाँग लाजाँग एफसी (२५ गुण) यांच्यात पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT