Goa Premier League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Premier League: धेंपो क्लबची नाट्यमय मुसंडी; अंतिम फेरीत धडक, पणजी जिमखान्याला नमविले

Dempo Cricket Club enters final: पणजी जिमखान्याला पाच विकेट्सनी नमवून त्यांनी धावसरासरीत जीनो स्पोर्ट्‌स क्लबलाही मागे टाकले आणि विजेतेपदासाठी दावा सांगितला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अखेरची पाचवी फेरी सुरू होणापूर्वी धेंपो क्रिकेट क्लबसाठी अंतिम फेरी अनिश्चित होती; पण या जिगरबाज संघाने कमाल केली. पणजी जिमखान्याला पाच विकेट्सनी नमवून त्यांनी धावसरासरीत जीनो स्पोर्ट्‌स क्लबलाही मागे टाकले आणि विजेतेपदासाठी दावा सांगितला.

स्पर्धेची डे-नाईट गुलाबी चेंडूची अंतिम लढत १५ एप्रिलपासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळली जाईल. त्यावेळी धेंपो क्रिकेट क्लबसमोर जेतेपदासाठी गतविजेत्या चौगुले स्पोर्ट्‌स क्लबचे आव्हान असेल. 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर रविवारी अभिनव तेजराणाच्या पाच विकेट्सच्या बळावर धेंपो क्लबने पणजी जिमखान्याचा दुसरा डाव २७० धावांत गुंडाळला. पहिल्या डावातील १२३ धावांच्या आघाडीमुळे धेंपो क्लबला १४८ धावांचे लक्ष्य मिळाले, ते त्यांनी पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. त्यांचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. 

अन्य लढतीत हरवळे-साखळी येथील नॅपेक्स मैदानावर षटकांच्या संथ गतीमुळे साळगावकर क्लबला पेनल्टी धावांची शिक्षा झाली व जीनो क्लबला पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी मिळाली; पण सामना अनिर्णित राहिल्यामुळे जीनो क्लबला अंतिम फेरी गाठणे शक्य झाले नाही.

अखेरच्या पाचव्या फेरीनंतरची स्थिती

चौगुले स्पोर्ट्‌स क्लब - २१ गुण (धावसरासरी १.२६५), धेंपो क्रिकेट क्लब - १५ गुण (१.११५), जीनो स्पोर्ट्‌स क्लब - १५ गुण (१.०३४), मडगाव क्रिकेट क्लब - ११ गुण (०.७६९), साळगावकर क्रिकेट क्लब - १० गुण (१.२२३), पणजी जिमखाना - ४ गुण (०.६८२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT