Dempo Club SC Defeats Delhi FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League Football: धेंपो क्लबच्या ‘सुपर सब’ची कमाल! दिल्ली एफसीविरोधात नोंदवला शानदार विजय; नेस्टरचा गोल ठरला निर्णायक

Dempo Club SC Defeats Delhi FC: सात मिनिटे बाकी असताना नेस्टर डायस याने नोंदवलेल्या गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दिल्ली एफसीवर १-० फरकाने मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांचा निर्णायक टप्प्यावर ‘सुपर सब’ (बदली खेळाडू) मैदानात उतरविण्याचा निर्णय समयोचित ठरला. सात मिनिटे बाकी असताना नेस्टर डायस याने नोंदवलेल्या गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल (Football) स्पर्धेत दिल्ली एफसीवर १-० फरकाने मात केली आणि पाच सामन्यानंतर पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

सामना बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. मागील पाच सामन्यांत चार विजय व एक बरोबरी अशी निराशाजनक कामगिरी केलेल्या पाच वेळच्या माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबच्या युवा संघाने बुधवारी शानदार खेळ केला. प्रशिक्षक समीर यांनी प्रारंभी सर्व अकरा भारतीय खेळाडूंचा संघ मैदानात उतरविला. संघाने आक्रमक खेळ केला, पण संधीचे गोलमध्ये त्यांना रुपांतर करता येत नव्हते. सामन्याच्या ७४व्या मिनिटास समीर यांनी संघात तीन बदल केले. नेस्टर, कपिल होबळे, तसेच दुखापतीतून सावरलेला अर्जेंटिनाचा ख्रिस्तियन दामियन रोआ या बदली खेळाडूंना मैदानात धाडले. नऊ मिनिटानंतर माजी विजेत्यांना आघाडी मिळाली. कपिलच्या असिस्टवर नेस्टरने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

धेंपो क्लबचा हा एकंदरीत चौथा विजय ठरला. त्यांचे ११ लढतीतून १४ गुण झाले असून गुणतक्त्यात सातवा क्रमांक मिळाला आहे. धेंपो क्लबचा पुढील सामना फातोर्डा येथेच राजस्थान युनायटेडविरुद्ध होईल. दिल्ली एफसीची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. त्यांना सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ११ लढतीनंतर ते नऊ गुणांसह अकराव्या क्रमांकावर कायम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

SCROLL FOR NEXT