Goa Team  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa Cricket Team Captain Deepraj Gawkar: अष्टपैलू दीपराज गावकर याला आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले.

Manish Jadhav

पणजी: अष्टपैलू दीपराज गावकर याला आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले असून रणजी करंडकात नेतृत्व केलेल्या दर्शन मिसाळ याला जबाबदारीतून विश्रांती देण्यात आली असून तो या स्पर्धेत खेळाडू या नात्याने खेळेल.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी 23 नोव्हेंबरपासून हैदराबाद येथे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. गोव्याचा प्रमुख फलंदाज सुयश प्रभुदेसाई संघाचा उपकर्णधार आहे.

संघातील खेळाडू

ईशान गडेकर, रोहन कदम, सुयश प्रभुदेसाई (उपकर्णधार), के. व्ही. सिद्धार्थ, कश्यप बखले, दर्शन मिसाळ, दीपराज गावकर (कर्णधार), मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, शुभम तारी, हेरंब परब, फेलिक्स आलेमाव, विकास सिंग, शिवेंद्र भुजबळ, विजेश प्रभुदेसाई.

गोव्याचे स्पर्धेतील वेळापत्रक

तारीख 23 नोव्हेंबर: विरुद्ध मुंबई, तारीख 25 नोव्हेंबर: विरुद्ध सेनादल, तारीख 27 नोव्हेंबर: विरुद्ध आंध्र, तारीख 1 डिसेंबर: विरुद्ध केरळ, तारीख 3 डिसेंबर: विरुद्ध महाराष्ट्र, तारीख 5 डिसेंबर: विरुद्ध नागालँड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT