Cristiano ronaldo, CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ronaldo In Goa: रोनाल्डो गोव्यात येणार? CM सावंतांनी केले आशावादी वक्तव्य; राज्याला ‘सुपरस्टार’च्या आगमनाचे वेध

Cristiano Ronaldo Goa Visit: रोनाल्डोच्या आगमनाबाबत केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरातील फुटबॉलप्रेमींत प्रचंड आकर्षण आहे. त्याचे येथे येणे राज्यासाठी अभिमानास्पद क्षण असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेत सौदी अरेबियन अल नासर संघातून एफसी गोवाविरुद्ध येत्या २२ ऑक्टोबरला फातोर्डा येथे खेळण्याबाबत अजूनही स्पष्टता नसली, तरी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आशावादी आहेत.

रोनाल्डोच्या आगमनाबाबत केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरातील फुटबॉलप्रेमींत प्रचंड आकर्षण आहे. त्याचे येथे येणे राज्यासाठी अभिमानास्पद क्षण असेल, तसेच गोमंतकीय युवा फुटबॉलपटूंत त्यामुळे प्रचंड उत्साह संचारेल, असा विश्वास डॉ. सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ते ताळगाव येथे गोवा फुटबॉल असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्य सरकारचे गोवा फुटबॉल असोसिएशनला (जीएफए) पूर्ण सहकार्य राहील याचा पुनरुच्चार केला. जीएफएच्या भाऊसाहेब बांदोडकर स्मृती करंडक फुटबॉल स्पर्धा आयोजनास राज्य सरकारचे पाठबळ लाभते, ते यापुढेही कायम राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्य सरकार या स्पर्धेच्या आयोजनासाठी दोन कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘राज्य सरकारचा सदोदित गोव्यातील फुटबॉलला पाठिंबा राहील. विशेषतः प्रशिक्षण आणि साधनसुविधा प्रगतिपथावर नेताना मुलींना आणि पायाभूत फुटबॉलला प्रोत्साहन दिले जाईल,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

कायतान फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएफए’च्या घोडदौडीचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिले, त्याचवेळी ‘फिफा’ जागतिक महिला फुटबॉल विकास समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गोव्याच्या वालंका आलेमाव यांचेही मुख्यमंत्र्यांना आपल्या भाषणात अभिनंदन केले.

फ्रान्सिस डिसोझा यांना जीवनगौरव पुरस्कार

गोव्यातील नामवंत फुटबॉलपटू, कोलकात्यात व्यावसायिक फुटबॉल खेळलेले पहिले गोमंतकीय, भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू फ्रान्सिस डिसोझा यांना पुरस्कार वितरण सोहळ्यात जीएफए जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सुकूर कुतिन्हो (२०२३) व निकोलस परेरा (२०२४) यांच्यानंतर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले फ्रान्सिस तिसरे फुटबॉलपटू ठरले. ‘मातारी’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या फ्रान्सिस यांनी गोवा आणि बंगालकडून खेळताना संतोष करंडक जिंकला होता. १९७८ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळलेल्या भारतीय फुटबॉल संघात त्यांचा समावेश होता. निष्णात आघाडीपटू ही त्यांची ओळख होती. १९८८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी फुटबॉल प्रशिक्षक, पात्र राष्ट्रीय रेफरी या नात्याने योगदान दिले.

इतर खेळाडूंचेही आकर्षण

सादियो माने (लिव्हरपूल), जुवाव फेलिक्स (चेल्सी), इनिगो मार्टिनेझ (बार्सिलोना), किंग्सली कोमन (बायर्न म्युनिक) हे अल नासर संघातील अन्य नावाजलेले फुटबॉलपटू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dindi Utsav: 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Goa Opinion: आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

SCROLL FOR NEXT