Cooch Behar Trophy Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: नाबाद 243 धावा, 7 विकेट्स; गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू खेळी; छत्तीसगडवर दणदणीत विजय

Cooch Behar Trophy 2025: एलिट ड गटातील लढतीत त्यांनी मंगळवारी यजमान छत्तीसगडला डाव व १३ धावांनी नमवून बोनस गुणाचीही कमाई केली. गोव्याला एकूण सात गुण मिळाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नाबाद द्विशतकानंतर कर्णधार यश कसवणकर याने फिरकी गोलंदाजीवर भन्नाट मारा करताना शिवेन बोरकर याच्या साथीत गोव्याला कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेस विजयी सुरवात करून दिली. एलिट ड गटातील लढतीत त्यांनी मंगळवारी यजमान छत्तीसगडला डाव व १३ धावांनी नमवून बोनस गुणाचीही कमाई केली.

छत्तीसगडमधील भिलाई येथे झालेला चार दिवसीय सामना तिसऱ्या दिवशी मंगळवारी संपला. डावाने विजय मिळविल्यामुळे गोव्याला एकूण सात गुण मिळाले. त्यांचा पुढील सामना २३ नोव्हेंबरपासून पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होईल.

गोव्याने दुसऱ्या दिवसअखेरच्या ९ बाद २३८ धावांवर डाव घोषित करून २१९ धावांची भक्कम आघाडी संपादन केली. यश कसवणकर २४३ धावांवर नाबाद राहिला. नंतर गोलंदाजीत गोव्याची फिरकी प्रभावी ठरली.

ऑफस्पिनर यश कसवणकर व लेगस्पिनर शिवेन बोरकर यांनी छत्तीसगडचा दुसरा डाव चहापानानंतर २०६ धावांत गुंडाळला. यश याने ४० धावांत ५, तर शिवेन याने ७० धावांत ३ गडी बाद केले. सामन्यात पहिल्या डावात २ गडी बाद केलेल्या गोव्याच्या कर्णधाराने दोन्ही डावांत मिळून ८७ धावांत ७ गडी टिपले.

संक्षिप्त धावफलक : छत्तीसगड, पहिला डाव : १७०. गोवा, पहिला डाव : ९ बाद ३८९ घोषित. छत्तीसगड, दुसरा डाव : ७८.४ षटकांत सर्वबाद २०६ (यशकुमार वर्धा ४६, विकल्प तिवारी ४२, वेदांश खेडिया ३३, समर्थ राणे ७-१-२१-०, चिगुरुपती व्यंकट ८-२-२३-१, मिहीर कुडाळकर १०-३-३३-०, यश कसवणकर २८.४-९-४०-५, शिवेन बोरकर २५-८-७०-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Diabetes Ranking: मधुमेहात गोवा देशात अव्वल! डॉ. कामत यांचा दावा; तरुणांमध्ये वाढते प्रमाण चिंताजनक

Zuarinagar Fire: भल्या पहाटे गोदामं पेटली! झुआरीनगरात खळबळ; कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता

Cutbona Jetty: कुटबण जेटीवरील 3 डिंगी बोटी जप्‍त! मच्छीमार खात्याची कारवाई; अवैधरीत्या पार्क केल्याने दणका

Goa Live News: बायणा दरोड्यात 15 वर्षीय मुलीचे शौर्य; कुटुंबाचा जीव वाचवला!

जैवविविधता, कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार! CM सावंत; मिठागर संदर्भातील विशेष कार्य समितीची झाली बैठक

SCROLL FOR NEXT