Cooch Behar Trophy 2024 Haryana Vs Goa Canva
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Cooch Behar Trophy 2024: गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार यश कसवणकर याने शुक्रवारी कर्णधारपदास साजेसे शतक झळकावले, त्यामुळे कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात हरियानाविरुद्ध आव्हानात्मक आघाडी मिळाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cooch Behar Trophy 2024 Haryana Vs Goa

पणजी: गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार यश कसवणकर याने शुक्रवारी कर्णधारपदास साजेसे शतक झळकावले, त्यामुळे कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात हरियानाविरुद्ध आव्हानात्मक आघाडी मिळाली. आता निकालासाठी गोलंदाजांकडून मोठी अपेक्षा संघाला आहे.

हरियानातील लाहली येथील चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर स्पर्धेच्या क गटातील सामना सुरू आहे. पहिल्या डावात ८८ धावांत गारद झालेल्या गोव्याने दुसऱ्या डावात यश कसवणकरच्या जिगरबाज शतकाच्या बळावर सर्वबाद ३१० धावा केल्या.

त्यामुळे त्यांच्यापाशी १२९ धावांची आघाडी जमा झाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर हरियानाची दुसऱ्या डावात ४ बाद ५५ अशी स्थिती असून त्यांना आणखी ७५ धावांची गरज आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी गोव्याच्या गोलंदाजांनी धारदार मारा केल्यास त्यांनाही विजयाची संधी असेल.

गोव्याने दुसऱ्या डावात सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५४ धावा केल्या होत्या. ३६ धावांवर नाबाद राहिलेल्या यश कसवणकरने शुक्रवारी चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करत गोव्याला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्याने २८९ चेंडूंत आठ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १०१ धावा केल्या.

कसवणकर याने जीवनकुमार चित्तेम (४४) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ७७ धावांची, तर अनुज यादव ((३७) याच्यासह आठव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. नंतर कसवणकर याने गोलंदाजीतही चमक दाखविताना दोन गडी बाद केले, त्यामुळे १३० धावांच्या आव्हानासमोर हरियानाची एकवेळ ४ बाद ३८ अशी स्थिती झाली होती. दिवसअखेर सुखलीन सिंग याच्या नाबाद २४ धावांमुळे यजमान संघाला दिलासा मिळाला. हरियानाने पहिल्या डावात १८१ धावांची आघाडी घेतली होती.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ८८

हरियाना, पहिला डाव ः २६९

गोवा, दुसरा डाव (५ बाद १५४ वरून) ः १२३.४ षटकांत सर्वबाद ३१० (यश कसवणकर १०१, जीवनकुमार चित्तेम ४४, पुंडलिक नाईक १, अनुज यादव ३७, समर्थ राणे नाबाद १२, नील नेत्रावळकर ०, दिलकश तनेजा २-६२, अझल सिवाच २-२७, मोक्ष मुदगिल ३-१५).

हरियाना, दुसरा डाव ः २१ षटकांत ४ बाद ५५ (अझल सिवाच १०, सुखलीन सिंग नाबाद २४, पुंडलिक नाईक ३-१-१४-०, समर्थ राणे ३-१-२-१, अनुज यादव ७-२-९-१, यश कसवणकर ७-१-२५-२, शमिक कामत १-०-२-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

IFFI 2024: ‘विषय हार्ड’; मानवी संबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT