I League Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: चर्चिल ब्रदर्सचा तडाखा! ऐजॉल एफसीला 6-0 ने चारली धूळ; अग्रस्थानी घेतली झेप

I League Football: दक्षिण आफ्रिकेचा वेड लेके याने दोन गोल केले. त्याने पहिला गोल तिसऱ्याच मिनिटास, तर नंतर ५३व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधला.

Sameer Panditrao

I League Churchill Brothers Vs Aizawal FC

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील मागील पराभवातून चर्चिल ब्रदर्स संघ रविवारी खडबडून जागा झाला. त्यांनी ऐजॉल एफसीवर जोरदार आक्रमण केले आणि सामना ६-० फरकाने एकतर्फी जिंकला.

राय पंचायत मैदानावर झालेल्या या लढतीत चर्चिल ब्रदर्सने निर्विवाद वर्चस्व राखले. विश्रांतीला ते दोन गोलने आघाडीवर होते. मागील लढतीत याच मैदानावर चर्चिल ब्रदर्सला नामधारी एफसीने एका गोलने नमविले होते.

दक्षिण आफ्रिकेचा वेड लेके याने दोन गोल केले. त्याने पहिला गोल तिसऱ्याच मिनिटास, तर नंतर ५३व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधला. ट्रिजॉय डायस यानेही दोन गोल नोंदविले. त्यांने अनुक्रमे २७व्या व ८०व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची अचूक दिशा दाखविली. याशिवाय सेनेगलचा पापे गास्सामा (७३ वे मिनिट) व बदली खेळाडू लुन्तिन्मांग हाओकिप (९०+६ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

चर्चिल ब्रदर्स संघ या विजयासह पुन्हा अग्रस्थानी आला आहे. स्पर्धेतील पाचव्या विजयामुळे त्यांचे आठ सामन्यांतून १६ गुण झाले आहेत. एक सामना कमी खेळलेल्या इंटर काशी एफसीपेक्षा त्यांचे दोन गुण जास्त आहेत. संघात सारे मिझोराम राज्यातीलच स्थानिक खेळाडू असलेल्या ऐजॉल एफसीला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आठ सामन्यानंतर त्यांचे सहा गुण कायम राहिले.

दरम्यान, स्पर्धेत रविवारी दिल्ली एफसीने एका खेळाडूस रेड कार्ड मिळूनही राजस्थान युनायटेडला १-१ असे गोलबरोबरीत रोखले. राजस्थानचे युनायटेडचे ११, तर दिल्ली एफसीचे नऊ गुण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

PM Modi Speech: टॅक्सचं ओझं कमी होणार, तरुणांसाठी रोजगार योजना; PM मोदींच्या लाल किल्ल्यावरुन दोन मोठ्या घोषणा

Chorao Ferryboat: महिनाभरापूर्वी बुडालेली फेरीबोट झाली दुरुस्त, ‘बेती’ पुन्हा सेवेत दाखल

Goa Today Live News: गोव्याला १४ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाले पण...

Cutbona Jetty: 1655 खलाशांची तपासणी, कॉलराची 13 प्रकरणे; कुटबण जेटीवर उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

SCROLL FOR NEXT