churchill brothers  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I-League Football Tournament: चर्चिल ब्रदर्सची पिछाडीवरुन विजयी मुसंडी; स्पोर्टिंग क्लब बंगळूरुचा उडवला धुवा

Churchill Brothers: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने बुधवारी यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. एका गोलच्या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना त्यांनी स्पोर्टिंग क्लब बंगळूरवर ३-१ फरकाने मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने बुधवारी यावेळच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. एका गोलच्या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना त्यांनी स्पोर्टिंग क्लब बंगळूरवर ३-१ फरकाने मात केली.

सामना बंगळूर येथे झाला. सामन्याच्या १२व्या मिनिटास जॉर्डन गार्रिडो याने केलेल्या गोलमुळे यजमान संघापाशी आघाडी जमा झाली. मागील लढतीत श्रीनिदी डेक्कनविरुद्ध पराभूत झालेल्या चर्चिल ब्रदर्सने पिछाडीनंतर सामन्यात जोरदार पुनरागमन साधले. कोलंबियन सेबॅस्टियन गुटिएर्रेझ याने २५व्या मिनिटास बरोबरीचा गोल नोंदविला. सेनेगलच्या पापे गास्सामा याने ३८व्या मिनिटास गोल केल्यामुळे विश्रांतीला चर्चिल ब्रदर्सने २-१ असे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांच्यासाठी सामन्यातील तिसरा गोल ८१व्या मिनिटास दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने नोंदविला. त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल ठरला.

स्पर्धेत तीन सामने खेळल्यानंतर चर्चिल ब्रदर्सचे आता चार गुण झाले असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचा पुढील सामना सात डिसेंबर रोजी कोझिकोड येथे गोकुळम केरळा संघाविरुद्ध होईल. स्पोर्टिंग क्लब बंगळूर संघ अजून विजयाविना आहे. त्यांना तिन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले असून ते अखेरच्या बाराव्या क्रमांकावर आहेत. श्रीनगर येथे बुधवारी रियल काश्मीरने दिल्ली एफसीवर २-१ फरकाने विजय नोंदवून सात गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबला गाठले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय; कॉन्स्टेबल पत्नीने पती आणि घरातील कामवालीचे केले अपहरण

Ravi Naik: रवि नाईक 'गुन्हेगारांना संभाळावे लागते' हे खोटं ठरवणारा 'गुन्हेगारांचा कर्दनकाळ' - संपादकीय

Goa Politics: खरी कुजबुज, गुन्हेगारांचा कर्दनकाळ गेला; एकच चर्चा

Goa Live Updates: आगरवाड्यात 25 रोजी आकाशकंदील स्पर्धा

Goa Politics: रवि यांच्या जागी कोण? 6 महिन्यांत पोटनिवडणूक, 'मगो'चा पाठिंबा पुत्र रितेशला

SCROLL FOR NEXT