Chandan Caro Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

UTT Table Tennis Tournament: गोव्याच्या 'चंदन'ची सुवर्णझेप! यूटीटी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

UTT National Ranking Table Tennis Tournament 2024: गोव्याचा प्रतिभाशाली युवा टेबल टेनिसपटू चंदन सिनाई कारे याने यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धा तिरुवनंतपुरम येथे झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Chandan Caro Goa Grabs Gold Medal In Table Tennis

पणजी: गोव्याचा प्रतिभाशाली युवा टेबल टेनिसपटू चंदन सिनाई कारे याने यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धा तिरुवनंतपुरम येथे झाली.

चंदनने अंतिम लढतीत तमिळनाडूच्या जे. एन. संजय अरविंद याच्यावर चार गेममध्ये ११-६, ८-११, ११-८, ११-९ फरकाने मात केली. त्यापूर्वी अटीतटीच्या उपांत्य लढतीत चंदनने पश्चिम बंगालच्या रिशान चट्टोपाध्याय याच्यावर १२-१०, १३-११, ७-११, ६-११, १६-१४ असा विजय नोंदवून आगेकूच राखली होती.

फातोर्डा येथील दक्षिण गोवा टेबल टेनिस अकादमीचे प्रशिक्षक राजा दयाल यांचे मडगावस्थित चंदनला मार्गदर्शन लाभते. राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या चंदन याचे गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुदिन वेरेकर यांनी अभिनंदन केले आहे. ‘‘चंदनची कामगिरी गोव्यासाठी अभिमानास्पद आहे, याद्वारे राज्यातील उदयोन्मुख प्रतिभा राष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये उदयास येत साक्ष मिळते,’’ असे वेरेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT