Canadian Rapper Drake And Virat Kohli Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IPL Final 2025: किंग कोहलीच्या RCB वर कॅनेडियन रॅपरने खेळला मोठा डाव, 6,41,08,974 रुपयांचा लावला सट्टा!

Canadian Rapper Drake On RCB: सोशल मीडियावर किंग कोहलीच्या चाहत्यांनी 'ए साला कप नामदे' (म्हणजे, यावर्षी कप आमचा आहे) ट्रेंड चालवला आहे. यातच, कॅनेडियन रॅपर ड्रेकने किंग कोहलीच्या RCB वर मोठा डाव खेळला. त्याने RCB वर लाखो डॉलर्सची पैज लावली.

Manish Jadhav

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात मंगळवारी (3 जून) आयपीएल 2025 चा फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. यंदाचा किताब जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर किंग कोहलीच्या चाहत्यांनी 'ई साला कप नामदे' (म्हणजे, यावर्षी कप आमचा आहे) असा ट्रेंडही चालवला आहे. याचदरम्यान, कॅनेडियन रॅपर ड्रेकने किंग कोहलीच्या RCB वर मोठा डाव खेळला. त्याने RCB वर लाखो डॉलर्सची पैज लावली.

दरम्यान, आयपीएल (IPL) 2025 चा फायनल सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तज्ज्ञांचे मते, यावर्षी जगभरातून आयपीएलवर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैज लावण्यात आली आहे. चाहते सामन्याचा निकाल, सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आणि प्रत्येक चेंडूवर काय होईल यावरही पैज लावत आहेत. फायनल सामन्यावर लाखो डॉलर्सची पैज लावली जाईल असा अंदाज आहे. काही लोक 5 डॉलर्सचा पैज लावत आहेत, तर काही हजारो डॉलर्सची पैज लावत आहेत. यामध्ये आता ड्रेकचाही समावेश झाला.

मंगळवारी (3 जून) ड्रेकने इंस्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये त्याने दाखवले की त्याने आरसीबीवर 750,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 64108874 रुपयांचा डाव खेळला आहे. जर आरसीबीने पीबीकेएसला हरवले तर ड्रेकला 1.312 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 112157697 रुपये मिळतील. ड्रेकने कॅप्शनमध्ये 'ई साला कप नामदे' असे लिहिले.

दरम्यान, यंदा आयपीएलला एक नवीन विजेता मिळेल. पीबीकेएस आणि आरसीबी दोघेही 2008 पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहेत, परंतु त्यांनी कधीही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही. आरसीबीने नऊ वर्षांपूर्वी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्या हंगामात विराट कोहलीने (Virat Kohli) 973 धावा केल्या होत्या. मात्र किताब जिंकता आला नव्हता. कोहली यंदाही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 600 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे कोहलीचा फॉर्म पाहता यंदाचा किताब आरसीबी जिंकेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT