Goa Cricket Team | C K Nayudu Trophy U 23 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: शिवेंद्र - लखमेशची शतकी भागीदारी! तरीही गोवा मोठ्या धावसंख्येपासून वंचित

C K Nayudu Trophy 2024: यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने शैलीदार शतक नोंदविताना अर्धशतक केलेल्या लखमेश पावणे याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या सहा विकेट २५ धावांत गमावल्यामुळे गोव्याला छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

C K Nayudu Trophy 2024 Goa vs Chhattisgarh

पणजी: यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने शैलीदार शतक नोंदविताना अर्धशतक केलेल्या लखमेश पावणे याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या सहा विकेट २५ धावांत गमावल्यामुळे गोव्याला छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही.

कर्नल सी.के. नायडू करंडक २३ वर्षांखालील ब गट क्रिकेट सामन्यात सोमवारी गोव्याचा पहिला डाव ४ बाद २४३ वरून २६८ धावांत संपुष्टात आला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर गोव्याचा डाव गडगडला. नंतर पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा छत्तीसगडने पहिल्या डावात २ बाद ३९ धावा केल्या. सांगे येथील जीसीए मैदानावर पावसाचे पाणी साचल्यामुळे दिवसभराचा खेळ पुढे सुरू होऊ शकला नाही.

शिवेंद्र याने १०० धावा केल्या. त्याने १४७ चेंडूंतील खेळीत १० चौकार व पाच षटकार मारले. चमकदार ५१ धावा करून लखमेश याने त्याला चांगली साथ दिली. लखमेशने १०५ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ५१ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

Horoscope: अडीच वर्षांनी शनिदेव सोडणार जागा, 2026 करणार मोठा न्याय! 'या' 3 राशी होणार मालामाल; करिअरमध्ये भरारी निश्चित

Drug Trafficking: गोळीबारात 64 हून अधिक ठार, 81 संशयितांना अटक, 42 रायफल्स जप्त; अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT