Goa Cricket Canva
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोव्याविरुद्ध उत्तर प्रदेशचा धावांचा डोंगर! सामना रंगतदार अवस्थेत

C K Nayudu U23 Cricket Trophy 2024: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात कर्णधार आराध्य यादव याच्या त्रिशतकाच्या बळावर उत्तर प्रदेशने धावपर्वत उभारला. त्यांनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पहिला डाव ६ बाद ५८७ धावांवर घोषित केला.

गोमन्तक डिजिटल टीम

C K Nayudu U23 Cricket Trophy 2024 Goa Vs Uttar Pradesh

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात कर्णधार आराध्य यादव याच्या त्रिशतकाच्या बळावर उत्तर प्रदेशने धावपर्वत उभारला. त्यांनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पहिला डाव ६ बाद ५८७ धावांवर घोषित केला.

कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या ब गट सामन्याच्या दुसऱ्या अखेर गोव्याने पहिल्या डावात १ बाद ८२ धावा केल्या होत्या.

सामन्याचा दुसरा दिवस उत्तर प्रदेशच्या आराध्य याने गाजविला. त्याने अगोदरच्या दिवशीच्या १५८ धावांवरून शनिवारी ३२० धावांनी शानदार खेळी केली. या दरम्यान त्याने ४१२ चेंडूंचा सामना करताना ३८ चौकार व एक षटकार मारला.

त्याने दोन मोठ्या भागीदारीही रचल्या. शोएब सिद्दिकी (१००) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी २४६ धावांची, तर प्रशांत वीर (नाबाद १००) याच्यासह सहाव्या विकेटसाठी २४९ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव (४ बाद ३१५ वरून) ः १२८.४ षटकांत ६ बाद ५८७ घोषित (आराध्य यादव ३२०, शोएब सिद्दिकी १००, प्रशांत वीर नाबाद १००, लखमेश पावणे ३०.४-१-११२-२, शिवम प्रताप सिंग २५-२-१०६-३, शदाब खान २३-२-८७-१, सनिकेत पालकर १३-०-५९-०, दीप कसवणकर १८-०-१११-०, आर्यन नार्वेकर ५-०-४४-०, अझान थोटा १४-०-६१-०).

गोवा, पहिला डाव ः २० षटकांत १ बाद ८२ (अझान थोटा नाबाद ३९, देवनकुमार चित्तेम १३, कौशल हट्टंगडी नाबाद २०, कुणाल त्यागी १-३३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT