Goa Circket  Canva
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोव्याच्या सलामीवीरांची झुंझार फलंदाजी! अझानचे शानदार शतक; सामना अनिर्णित राखण्यात यश

C K Nayudu U 23 Cricket Trophy 2024: कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या चार दिवसीय सामन्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी गोव्यासमोर सामना वाचविण्याचे कठीण आव्हान होते. फॉलोऑननंतर तिसऱ्या दिवसअखेरच्या बिनबाद १०७ धावांवरून अझान व देवन यांनी समजूतदारपणे फलंदाजी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

C K Nayudu U 23 Cricket Trophy 2024 Goa Vs Uttar Pradesh

पणजी: शतकवीर अझान थोटा याने देवनकुमार चित्तेम याच्यासह झुंझार फलंदाजी करताना १९४ धावांची सलामी दिली, त्या बळावर ३९३ धावांच्या पिछाडीवरून गोव्याने उत्तर प्रदेशविरुद्धचा कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या चार दिवसीय सामन्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी गोव्यासमोर सामना वाचविण्याचे कठीण आव्हान होते. फॉलोऑननंतर तिसऱ्या दिवसअखेरच्या बिनबाद १०७ धावांवरून अझान व देवन यांनी समजूतदारपणे फलंदाजी करताना खराब चेंडूंचा समाचार घेतला. अझान याने शानदार १११ धावा करताना १४९ चेंडूंतील खेळीत १४ चौकार मारले. देवनकुमार ८२ धावांवर बाद झाला. त्याने २०७ चेंडूंत दहा चौकार मारले.

दोघेही जम बसलेले फलंदाज २६ धावांत माघारी फिरल्यानंतर कर्णधार कौशल हट्टंगडी (२८) याने आक्रमक शैलीच्या शिवेंद्र भुजबळ (४१) याच्या साथीत उत्तर प्रदेशचा संघ सामन्याची सूत्रे हाती घेणार नाही याची खात्री बाळगली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे अखेरच्या दिवशी चहापानाला दोन्ही संघांच्या मान्यतेने सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला. गोव्याने दुसऱ्या डावात २ बाद २८३ धावा केल्या. खेळ थांबविण्याता तेव्हा ते ११० धावांनी मागे होते.

अनिर्णित लढतीतून गोव्याला चार गुण मिळाले. यामध्ये फलंदाजीत एक, गोलंदाजीत दोन, तर सामन्यातील एका गुणाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशला १२ गुण मिळाले. त्यांना फलंदाजीत पाच, गोलंदाजीत चार व सामन्यातून तीन गुण प्राप्त झाले. स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर ‘ब’ गटात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ६० गुण झाले असून ते अव्वल आहेत. गोव्याचे पाच सामन्यांतून २९ गुण झाले असून आठ संघांत ते सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांचा पुढील सहावा सामना २५ जानेवारीपासून जम्मू-काश्मीरविरुद्ध सांगे येथे होईल, तर साखळी फेरीतील अखेरचा सामना एक फेब्रुवारीपासून गुजरातविरुद्ध वलसाड येथे खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक ः उत्तर प्रदेश, पहिला डाव ः ६ बाद ५८७ घोषित.

गोवा, पहिला डाव ः १९४ व दुसरा डाव (बिनबाद १०७ वरून) ः ८७ षटकांत २ बाद २८३ (अझान थोटा १११, देवनकुमार चित्तेम ८२, कौशल हट्टंगडी नाबाद २८, शिवेंद्र भुजबळ नाबाद ४१, रिषभ बंसल १-६०, स्वास्तिक १-१६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

DGCA Ticket Rules Change: 48 तासांत मोफत कॅन्सलेशन, 21 दिवसांत मिळणार रिफंड... विमान प्रवासाचे 7 नियम बदलले; कधीपासून लागू होणार?

Liquor Seized: गुन्हे शाखेची मोठी कारवाई! केळीनी-उसगाव येथील गोदामातून दारूचे 500 बॉक्स जप्त; 4 जणांना घेतलं ताब्यात

Serendipity Festival 2025: सेरेंडिपिटीमध्ये कोणती नाटके पाहायला मिळणार? वाचा माहिती..

Konkani Drama Competition: मनाला स्फूर्ती देणारे 'होमखंड'; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT