Goa Vs punjab Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोव्याचा दारुण पराभव! पंजाबचा एक डाव, 296 धावांनी विजय; फलंदाजांची दुसऱ्या डावातही शरणागती

Goa Vs punjab: कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर झालेला एलिट अ गट चार दिवसीय सामना रविवारी तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच संपला.

गोमन्तक डिजिटल टीम

CK Nayudu Trophy 2026 : गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघातील फलंदाजांनी दुसऱ्या डावातही शरणागती पत्करल्यामुळे अपेक्षेनुसार कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत पंजाबने रविवारी डाव व २९६ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर झालेला एलिट अ गट चार दिवसीय सामना रविवारी तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच संपला. पंजाबने पहिल्या डावात ५ बाद ५३३ अशी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोव्याची शनिवारी दुसऱ्या दिवशी दाणादाण उडाली व त्यांचा पहिला डाव ९२ धावांत संपुष्टात आला होता.

४४१ धावांच्या आघाडीसह पंजाबने गोव्यावर फॉलोऑन लादला होता. दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात १ बाद ५८ धावा केल्या होत्या. रविवारी बाकी नऊ फलंदाज जास्त प्रतिकार करू शकले नाहीत व डाव १४५ धावांत संपुष्टात आला. या लढतीतून पंजाबला एकूण १६ गुण मिळाले.

यामध्ये फलंदाजीतील पाच, गोलंदाजीतील चार, तर बोनस गुणासह विजयाचे सात गुण आहेत. त्यांचा हा पाच सामन्यांतील तिसरा विजय ठरला. ६० गुणांसह त्यांनी अग्रस्थान मजबूत केले आहे. गोव्याला गोलंदाजीतील फक्त एकच गुण मिळाला.पाच लढतीतून त्यांचे २१ गुण असून ते आठ संघांत सातव्या क्रमांकावर आहेत. गोव्याचा हा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला. दुसऱ्यांदा त्यांना सामना डावाने गमवावा लागला. गोव्याचा स्पर्धेतील सहावा सामना केरळविरुद्ध त्रिवेंद्रम येथे ६ फेब्रुवारीपासून खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

पंजाब, पहिला डाव ः ५ बाद ५३३ घोषित. गोवा, पहिला डाव ः ९२

गोवा, दुसरा डाव (फॉलोऑन, १ बाद ५८ वरून) ः ७०.३ षटकांत सर्वबाद १४५ (रिजुल पाठक १७, अनुज यादव ३७, जीवनकुमार चित्तेम ०, आर्यन नार्वेकर ३२, चिरुगुपती व्यंकट २, कौशल हट्टंगडी १६, अमन धूपर ०, मनीष काकोडे ०, समर्थ राणे नाबाद ०, फरदीन खान ०, हरजससिंग टंडन ३-५२, डेलव्ह कुमार गोयल २-१५, हवनीत सिंग ५-२५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

Goa Tourism: पर्यटन हंगामात यंदा दाबोळीत 144 चार्टर्ड विमाने! 26 हजार परदेशी पर्यटक येणार, विमानतळ प्रशासनाची माहिती

SCROLL FOR NEXT