Goa Vs Jammu Kashmir Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोव्याच्या फिरकी गोलंदाजाचा भीमपराक्रम! 77 धावांत 11 गडी बाद; जम्मू काश्मीरचा दारुण पराभव

Goa Vs Jammu Kashmir: जम्मू येथील हॉस्टेल मैदानावर झालेल्या लढतीत मनीषने दोन्ही डावांत मिळून ७७ धावांत ११ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: लेगस्पिनर मनीष यादव याच्या जादुई फिरकीसमोर जम्मू-काश्मीरच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाने सपशेल नमते घेतले, परिणामी गोव्याला कर्नल सी. के. नायडू करंडक एलिट अ गटात १४६ धावांनी दणदणीत विजय नोंदविता आला. जम्मू येथील हॉस्टेल मैदानावर झालेल्या लढतीत मनीषने दोन्ही डावांत मिळून ७७ धावांत ११ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

चार दिवसीय सामना रविवारी तिसऱ्याच दिवशी संपला. एकूण २६६ धावांची आघाडी घेतल्यानंतर गोव्याने जम्मू-काश्मीरचा दुसरा डाव १२० धावांत गुंडाळला. मनीषने दुसऱ्या डावात अवघ्या २८ धावांत ५ गडी बाद केले. त्याने पहिल्या डावात ४९ धावांत ६ गडी टिपले होते.

अर्णव गुप्ता (५२) याचे अर्धशतक वगळता यजमान संघाचे इतर फलंदाज गोव्याच्या गोलंदाजांचा सामना करू शकले नाहीत. कर्णधार ऑफस्पिनर यश कसवणकर याने २६ धावांत ३, तर मध्यमगती समर्थ राणे याने ४० धावांत २ गडी बाद केले.

त्यापूर्वी, गोव्याने पहिल्या डावात ७४ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात १९२ धावा केल्या. पहिल्या डावात शानदार शतक केलेल्या शंतनू नेवगी याने दुसऱ्या डावातही चमकदार फलंदाजी केली. त्याने १२२ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. जम्मू-काश्मीरच्या प्रफुल धर याने ५६ धावांत ६ गडी टिपले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २८६

जम्मू-काश्मीर, पहिला डाव ः २१२

गोवा, दुसरा डाव (बिनबाद २४ वरून) ः ७१ षटकांत सर्वबाद १९२ (सार्थक भिके ३४, आदित्य कोटा ११, शंतनू नेवगी ६४, यश कसवणकर ५, कौशल हट्टंगडी ८, जीवनकुमार चित्तेम १०, दिशांक मिस्कीन नाबाद २०, अनुज यादव ३, मनीष काकोडे १९, समर्थ राणे ०, सुजय नाईक ०, प्रफुल धर १८-२-५३-६, सर्वाशिष सिंग २४-४-६६-३).

जम्मू-काश्मीर, दुसरा डाव ः ३०.१ षटकांत सर्वबाद १२० (अर्णव गुप्ता ५२, रिदम १८, बासित बशीर १८, यश कसवणकर ९-२-२६-३, समर्थ राणे ५-१-४०-२, मनीष काकोडे १०.१-२-२८-५, अनुज यादव ६-१-१८-०).

गोव्याला मिळाले १२ गुण

या सामन्यातून गोव्याला एकूण १२ गुण मिळाले. यामध्ये फलंदाजीत दोन, गोलंदाजीत चार, तर विजयाच्या सहा गुणांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरने फलंदाजी एक व गोलंदाजीत चार मिळून पाच गुण प्राप्त केले. गोव्याने सात सामन्यांतून एक विजय, चार पराभव, एक अनिर्णित व एक रद्द या कामगिरीसह एकूण ३८ गुणांची कमाई केली. जम्मू-काश्मीरचे सात लढतीतून एक विजय, चार पराभव व दोन अनिर्णित निकालासह ३८ गुण झाले. कोशंटवर जम्मू-काश्मीरला (०.७०२) सहावा, तर गोव्याला (०.६२१) सातवा क्रमांक मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT