Goa Vs Punjab Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Nayudy Trophy: 23 चौकार, 6 षटकार! गोव्याविरुद्ध दिवसात ठोकले द्विशतक; पंजाबचा धावांचा डोंगर

Goa Vs Punjab: युवी याने १२९ चेंडूंतील खेळीत ११ चौकार व तीन षटकार मारले. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १९० धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक एलिट अ सामन्यात पंजाबच्या झंझावाती फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यांनी दिवसभरातील ९० षटकांत १ बाद ४३५ असा धावपर्वत रचला. चार दिवसीय सामन्याला शुक्रवारपासून कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर सुरवात झाली.

पंजाबचा रणजीपटू हरनूरसिंग पन्नू याने तुफानी फलंदाजी करताना वाढदिनी नाबाद द्विशतक ठोकले. दिवसअखेर तो २२८ धावांवर खेळत होता, त्याने २४४ चेंडूंचा सामना करताना २३ चौकार व सहा उत्तुंग षटकार मारले. युवी गोयल १०५ धावा करून हरनूरला साथ देत होता.

युवी याने १२९ चेंडूंतील खेळीत ११ चौकार व तीन षटकार मारले. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १९० धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. त्यापूर्वी सलामीचा जसकरणवीर सिंग पॉल व हरनूर यांनी २४५ धावांची सलामी दिली. जसकरणवीर याला लेगस्पिनर मनीष काकोडे याने पायचीत बाद केले. त्याने १६७ चेंडूंतील खेळीत ११ चौकारांसह ८८ धावा केल्या.

दहा रणजी सामन्यांचा अनुभव

२३ वर्षीय डावखुरा फलंदाज हरनूर आतापर्यंत १० रणजी सामने खेळला असून एक शतकही ठोकले आहे. डिसेंबर-जानेवारीत झालेल्या सीनियर पातळीवरील विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत हरनूर याने छत्तीसगडविरुद्ध नाबाद ११५ धावा, तर गोव्याविरुद्ध नाबाद ९४ धावा केल्या होत्या, नंतर मध्य प्रदेशविरुद्ध त्याने अर्धशतक केले होते. भारताच्या २०२२ मधील १९ वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या संघाचा हरनूर प्रमुख खेळाडू होता.

संक्षिप्त धावफलक

पंजाब, पहिला डाव ः ९० षटकांत १ बाद ४३५ (जसकरणवीर सिंग पॉल ८८, हरनूरसिंग पन्नू नाबाद २२८, युवी गोयल नाबाद १०५, चिगुरुपती व्यंकट ११-२-३९-०, समर्थ राणे १५-१-७६-०, फरदीन खान १३-१-७१-०, कौशल हट्टंगडी १-०-१७-०, अनुज यादव २८-१-९८-०, मनीष काकोडे १८-०-१०५-१, अमन धूपर ४-०-१५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गेले कुठे?

Chimbel: चिंबलच्या आंदोलनकर्त्यांवर जमावबंदी का? पाटकर यांचा सवाल; भाजपविरोधात तक्रार न केल्यास घेराव घालण्याचा इशारा

Arvind Kejriwal: "गोव्यातील लोकांना आप हाच आधार ठरणार आहे", केजरीवालांचे प्रतिपादन Watch Video

'ती गोव्यात बॉम्ब ठेवणार आहे'! मैत्रिणीला फिरायला जाण्यापासून रोखण्यासाठी तरुणाचे भलतेच धाडस; रेल्वे पोलिसांकडून गुन्हा नोंद

Ranji Trophy: गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई! केरळच्या रोहन कुन्नुम्मलचे आक्रमक शतक; पाहुणा संघ आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT