goa vs jammu kashmir ck nayudu trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: 49 धावांत 6 आऊट! मनीष काकोडेने जम्मू-काश्मीरला गुंडाळले; गोव्याला पहिल्या डावात आघाडी

Goa Vs Jammu Kashmir: पहिल्या डावात २८६ धावा केलेल्या गोव्याने दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावा केल्या होत्या. आता त्यांच्यापाशी एकूण १०३ धावांची आघाडी जमा झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मनीष काकोडे याच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात शनिवारी गोव्याने जम्मू-काश्मीरवर पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी घेतली. या लेगस्पिनरने ४९ धावांत ६ गडी बाद केले.

जम्मू येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरचा पहिला डाव २०७ धावांत आटोपला. पहिल्या डावात २८६ धावा केलेल्या गोव्याने दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात बिनबाद २४ धावा केल्या होत्या. आता त्यांच्यापाशी एकूण १०३ धावांची आघाडी जमा झाली आहे.

मनीष आणि तीन गडी बाद केलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अनुज यादव यांच्या फिरकी माऱ्याला तोंड देणे जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांना शक्य झाले नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २८६

जम्मू-काश्मीर, पहिला डाव (बिनबाद १० वरून) ः ७७.४ षटकांत सर्वबाद २०७ (आकाश भट २६, उधय परताप ६४, रिदम ४५, यश कसवणकर १९-४-५२-०, अनुज यादव २३.४-३-५७-३, समर्थ राणे ७-३-४-०,

सुजय नाईक ५-२-२४-१, मनीष काकोडे २२-७-४९-६, शंतनू नेवगी १-०-१६-०).

गोवा, दुसरा डाव ः १२ षटकांत बिनबाद २४ (सार्थक भिके नाबाद १३, आदित्य कोटा नाबाद ११).

गतवर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती

मनीष काकोडे याने गतवर्षी जानेवारीत सांगे येथे झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत जम्मू-काश्मीरविरुद्धच दुसऱ्या डावात ५८ धावांत ७ गडी बाद केले होते. याच संघाविरुद्ध त्याने शनिवारी मागील कामगिरीची पुनरावृत्ती केली. एकंदरीत त्या सामन्यात त्याने १० गडी (३-८३ व ७-५८) बाद करण्याचा पराक्रम साधला होता व गोव्याने चार विकेट राखून विजय नोंदविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT