Goa Cricket Dainik
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

C K Nayudu Cricket U 23 Trophy: अझान थोटा व कर्णधार कौशल हट्टंगडी यांची दुसऱ्या विकेटची शतकी भागीदारी भंगल्यानंतर गोव्याच्या फलंदाजांनी आत्मघातकी फलंदाजी केली, परिणामी कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आली.

गोमन्तक डिजिटल टीम

C K Nayudu Cricket U 23 Trophy Goa Vs Uttar Pradesh

पणजी: अझान थोटा व कर्णधार कौशल हट्टंगडी यांची दुसऱ्या विकेटची शतकी भागीदारी भंगल्यानंतर गोव्याच्या फलंदाजांनी आत्मघातकी फलंदाजी केली, परिणामी कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आली. नंतर दुसऱ्या डावात अभेद्य शतकी भागीदारीमुळे थोडेफार सावरता आले.

स्पर्धेच्या ‘ब’ गटातील सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. ३९३ धावांच्या पिछाडीनंतर गोव्याने दुसऱ्या डावात रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा २९ षटकांत बिनबाद १०७ धावा केल्या होत्या.

ते अजून २८६ धावांनी मागे आहेत. पहिल्या डावातील अर्धशतकवीर अझान थोटा ५७ धावांवर खेळत असून त्याने ८७ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार मारले. देवनकुमार चित्तेम ४४ धावांवर खेळत आहे. त्याने ८७ चेंडूंतील खेळीत सात चौकार मारले.

त्यापूर्वी, कालच्या १ बाद ८२ धावांवरून गोव्याने अतिशय निराशाजनक फलंदाजी केली. दुसऱ्या विकेटसाठी कौशलसह (५२) ११५ धावांची भागीदारी केल्यानंतर अझान (६३) पायचीत बाद झाला. त्याच धावसंख्येवर कौशल माघारी परतला. या दोघांसह नऊ विकेट गोव्याने अवघ्या ५६ धावांत गमावल्यामुळे गोव्याचा पहिला डाव १९४ धावांत संपुष्टात आला. गोव्याच्या मध्यफळीने खराब फलंदाजी केली, १९ धावांत ५ गडी बाद झाल्यामुळे गोव्याची ८ बाद १७६ अशी दाणदाण उडाली.

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव ः ६ बाद ५८७ घोषित.

गोवा, पहिला डाव (१ बाद ८२ वरून) ः ६२.२ षटकांत सर्वबाद १९४ (अझान थोटा ६३, कौशल हट्टंगडी ५२, आनंद तेंडुलकर १, शिवेंद्र भुजबळ १७, आर्यन नार्वेकर १२, दीप कसवणकर २, लखमेश पावणे ०, सनिकेत पालकर नाबाद १२, शदाब खान ५, शिवम प्रताप सिंग ०, कुणाल त्यागी १-५८, विजय कुमार ३-२५, रिषभ बन्सल २-५४, प्रशांत वीर ३-२६).

गोवा, दुसरा डाव ः २९ षटकांत बिनबाद १०७ (अझान थोटा नाबाद ५७, देवनकुमार चित्तेम नाबाद ४४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

SCROLL FOR NEXT