Goa Vs Nagaland Canva
गोंयचें खेळामळ

C K Nayudu Trophy: गोवा विजयाच्या उंबरठयावर! फॉलोऑननंतर नागालँडची सावध सुरुवात

C K Nayudu Cricket Trophy 2024: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील ब गट सामन्यात गोव्याने २०२ धावांची आघाडी घेतल्यानंतर नागालँडवर फॉलोऑन लादला. त्यानंतर यजमान संघाने डावाचा पराभव टाळण्यासाठी झुंज देताना दुसऱ्या डावात २ बाद १०७ धावा केल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

C K Nayudu Cricket Trophy U23 2024 Goa Vs Nagaland

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील ब गट सामन्यात गोव्याने २०२ धावांची आघाडी घेतल्यानंतर नागालँडवर फॉलोऑन लादला. त्यानंतर यजमान संघाने डावाचा पराभव टाळण्यासाठी झुंज देताना दुसऱ्या डावात २ बाद १०७ धावा केल्या. ते अजून ९५ धावांनी मागे आहेत.

सामना नागालँडमधील सोविमा येथे सुरू आहे. गोव्याच्या ४५९ धावांना उत्तर देताना नागालँडचा पहिला डाव कालच्या २ बाद ११८ वरून मंगळवारी २५७ धावांत आटोपला. नंतर दुसऱ्या डावातही मुघावी सुमी याने आक्रमक अर्धशतक केले. त्यामुळे नागालँडला शतकी धावसंख्या पार करता आली. सुमी याने ६६ चेंडूंत नऊ चौकार व एका षटकारासह ५७ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ४५९.

नागालँड, पहिला डाव (२ बाद ११८ वरून) ः १०४.५ षटकांत सर्वबाद २५७ (केनेईझेतुओ रियो ३१, युगंधर २०, सुजल प्रसाद २५, अर्जुन ३०, अनिल गुप्ता नाबाद २३, सौरव १९, शदाब खान ३९-१५-८७-३, लखमेश पावणे २१-५-६०-२, शिवम प्रताप सिंग १०-१-३३-०, अभिनंदन ठाकूर १२-२-२१-०, अझान थोटा ७-२-१३-१, कौशल हट्टंगडी १२-५-१६-२, आर्यन नार्वेकर ३.५-०-६-२) व दुसरा डाव ः ३६ षटकांत २ बाद १०७ (विशाल साहानी नाबाद ३३, मुघावी सुमी ५७, युगंधर नाबाद २०, कौशल हट्टंगडी १-८, आर्यन नार्वेकर १-१२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT