Bhausaheb Bandodkar Football Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: ओडिशा एफसीचा निसटता विजय; चेन्नईयीन एफसीला १-० असे नमवून ओडिशा उपांत्य फेरीत

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: दिएगो मॉरिसियोच्या पेनल्टी गोलमुळे चेन्नईयीन एफसीवर एका गोलने मात; चर्चिल ब्रदर्सचे आव्हान संपुष्टात

गोमन्तक डिजिटल टीम

Bandodkar Football Trophy 2024

पणजी: दिएगो मॉरिसियो याने पेनल्टी फटक्यावर केलेल्या गोलच्या बळावर ओडिशा एफसीने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत ब गटातून उपांत्य फेरी निश्चित केली. त्यांनी बुधवारी सलग दुसरा विजय नोंदविताना चेन्नईयीन एफसीला १-० असे निसटते हरविले.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याचा पूर्वार्ध संपण्यास काही मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनचा गोलरक्षक समिक मित्रा याने ओडिशाच्या रॉय कृष्णा याला गोलक्षेत्रात पाडले. यावेळी ओडिशा एफसीला पेनल्टी फटका मिळाला. ब्राझीलियन मॉरिसियो याने ३८व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखवत संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

ओडिशा एफसीने अगोदरच्या लढतीत डिफेन्सा जस्टिसिया संघाला २-१ असे हरविले होते. त्यांचे आता सर्वाधिक सहा गुण झाले आहेत. अखेरच्या लढतीत ते चर्चिल ब्रदर्सविरुद्ध खेळतील. चेन्नईयीन एफसी व डिफेन्सा जस्टिसिया यांच्यातील अखेरचा साखळी सामना निर्णायक आहे. प्रत्येकी एक सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघांचे समान तीन गुण असल्याने त्यांच्यात पुढील फेरी गाठण्यासाठी चुरस राहील.

चर्चिल ब्रदर्सचे आव्हान संपुष्टात

चर्चिल ब्रदर्सने कडवी झुंज दिली, पण ते अर्जेंटिनातील डिफेन्सा जस्टिसिया संघाला विजयापासून रोखू शकले नाही. त्यामुळे गोव्यातील आय-लीग संघाचे भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील आव्हान सलग दुसऱ्या पराभवामुळे संपुष्टात आले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी झालेल्या ‘ब’ गट लढतीत डिफेन्सा जस्टिसिया संघाने चर्चिल ब्रदर्सला १-० फरकाने नमविले. व्हर्गारा क्रूझ याने ३५व्या मिनिटास केलेला गोल पाहुण्या संघासाठी निर्णायक ठरला. त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक दुसरागोल ठरला.

डिफेन्सा जस्टिसिया संघाला अगोदरच्या लढतीत ओडिशा एफसीकडून २-१ फरकाने पराभव पत्करावा लागला होता. बुधवारच्या विजयामुळे त्यांचे ब गटातील आव्हान तीन गुणांसह जिवंत राहिले. चेन्नईयीन एफसीविरुद्ध ४-१ फरकाने पराभूत झालेल्या चर्चिल ब्रदर्स आगेकूच राखण्याची संधी हुकली. गटसाखळीतील अखेरच्या लढतीत डिफेन्सा जस्टिसिया चेन्नईयीन एफसीविरुद्ध, तर चर्चिल ब्रदर्स ओडिशा एफसीविरुद्ध खेळेल.

सामन्यातील अर्ध्या तासाच्या खेळानंतर माशादो इमानोल याने व्हर्गारा क्रूझ याला चेंडू पुरविला. या आघाडीपटूने चेंडू छातीवर नियंत्रित केला आणि नंतर चर्चिल ब्रदर्सच्या बचावपटूंना गुंगारा दिल्यानंतर गोलरक्षकालाही चेंडू अडविण्याची संधी दिली नाही. अर्जेंटिनातील अव्वल साखळीतील क्लबला आघाडी वाढविण्याची संधी होती, परंतु बुस्तोस गॅब्रिएल याचा गोल अवैध ठरविण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT