Bhausaheb Bandodkar Memorial Trophy 2024 Facebook
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: बांदोडकर फुटबॉल स्पर्धा रंगणार आजपासून; प्रथमच विदेशी संघांचा सहभाग

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: स्पर्धेतील उपांत्य लढती तीन सप्टेंबर रोजी, तर अंतिम सामना सहा सप्टेंबर रोजी खेळला जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sports update

पणजी: भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीला शनिवारपासून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरवात होत आहे. स्पर्धेतील उपांत्य लढती तीन सप्टेंबर रोजी, तर अंतिम सामना सहा सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एफसी गोवा, ओडिशा एफसी, चेन्नईयीन एफसी, तसेच गोव्यातील आय-लीग संघ चर्चिल ब्रदर्स व धेंपो क्लब यांच्यासाठी मोसमपूर्व तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर व अर्जेंटिनातील क्लब देपोर्तिव्हा डिफेन्सा जस्टिसिया यांच्या समावेशामुळे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय साज चढला आहे.

स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत एफसी गोवा संघाने विजेतेपद पटकावले होते. २०२३-२४ मोसमाच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या स्पर्धेत एफसी गोवा संघाच्या डेव्हलपमेंट संघाने वर्चस्व राखले होते. यावेळी प्रथमच विदेशी संघ निमंत्रित करण्यात आले आहेत.

स्पर्धेच्या साखळी फेरीचे वेळापत्रक :

तारीख २४ ऑगस्ट ः एफसी गोवा विरुद्ध स्पोर्टिंग क्लब द गोवा, धेंपो क्लब विरुद्ध ब्रिस्बेन रोअर. तारीख २५ ऑगस्ट ः चर्चिल ब्रदर्स विरुद्ध चेन्नईयीन एफसी, ओडिशा एफसी विरुद्ध क्लब देपोर्तिव्हो डिफेन्सा जस्टिसिया. तारीख २७ ऑगस्ट ः स्पोर्टिंग क्लब द गोवा विरुद्ध धेंपो क्लब, ब्रिस्बेन रोअर विरुद्ध एफसी गोवा. तारीख २८ ऑगस्ट ः क्लब देपोर्तिव्हो डिफेन्सा जस्टिसिया विरुद्ध चर्चिल ब्रदर्स, ओडिशा एफसी विरुद्ध चेन्नईयीन एफसी. तारीख ३० ऑगस्ट ः ब्रिस्बेन रोअर विरुद्ध स्पोर्टिंग क्लब द गोवा, धेंपो क्लब विरुद्ध एफसी गोवा. तारीख ३१ ऑगस्ट ः चर्चिल ब्रदर्स विरुद्ध ओडिशा एफसी, चेन्नईयीन एफसी विरुद्ध क्लब देपोर्तिव्हो डिफेन्सा जस्टिसिया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT