Bhausaheb Bandodkar Memorial Trophy 2024 Facebook
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: कोण खेळणार अंतिम फेरी? गतविजेत्या एफसी गोवाची नजर अंतिम फेरीकडे

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: एफसी गोवा व डिफेन्सा जस्टिसिया यांच्यात पहिली लढत होईल तर नंतर प्रकाशझोतात ओडिशा एफसीसमोर ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर्सचे आव्हान असेल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मानोलो मार्केझ यांनी भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाचा ताबा घेतला असल्याने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील पुढील मोहिमेसासाठी एफसी गोवा संघ साहाय्यक प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर उतरेल. या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनातील सीएसडी डिफेन्सा जस्टिसिया संघाविरुद्ध उपांत्य लढत खेळताना गतविजेत्यांची नजर अंतिम फेरीकडेच असेल.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी दोन्ही उपांत्य लढती होतील. एफसी गोवा व डिफेन्सा जस्टिसिया यांच्यात पहिली लढत होईल, तर नंतर प्रकाशझोतात ओडिशा एफसीसमोर ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर्सचे आव्हान असेल.

मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी फेरीत एफसी गोवाने तिन्ही लढती जिंकून अ गटात अव्वल स्थान मिळविले. अर्जेंटिनातील युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या डिफेन्सा जस्टिसिया संघाने ब गटात दुसरा क्रमांक मिळविला. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसीने ब गटात तिन्ही सामने जिंकून अग्रस्थान पटकावले. ब्रिस्बेन रोअर्स एफसी अ गटात दोन विजयांसह दुसऱ्या स्थानी राहिला.

उपांत्य लढतीच्या पूर्वसंध्येला एफसी गोवाचे साहाय्यक प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांनी सांगितले, की ‘‘डिफेन्सा जस्टिसियाने कणखर खेळ प्रदर्शित केला आहे. ओडिशाविरुद्ध ते निसटत्या फरकाने पराभूत झाले, तर चेन्नईयीनला नमविताना उच्च दर्जाचा खेळ केला. त्यांचा संघ सुव्यवस्थित असून ते बचावात मजबूत ठरले आहेत. त्यांची खेळण्याची थेट शैली आक्रमक आहे. त्यामुळे आम्हाला खडतर आव्हान अपेक्षित आहे.’’ एफसी गोवाने साखळी फेरीतील तीन लढतीत सात गोल नोंदविले, त्यापैकी तीन गोल अल्बानियाच्या आर्मांदो सादिकू याने, तर दोन गोल बोर्हा हेर्रेरा याने केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT