Bhausaheb Bandodkar Memorial Trophy 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: धेंपो क्लबची जोरदार मुसंडी; सलग दुसऱ्या पराभवामुळे स्पोर्टिंग क्लबचे आव्हान संपुष्टात

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: गोव्यातील दोन्ही संघांना अगोदरच्या लढतीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले होते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील गोवन डर्बीत धेंपो स्पोर्टस क्लबने २-१ फरकाने बाजी मारली, तर अ गटातील सलग दुसऱ्या पराभवामुळे स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे आव्हान संपुष्टात आले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या लढतीत धेंपो क्लबसाठी कपिल होबळे याने ३२व्या, तर शुभम रावत याने ७३व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. त्यापूर्वी, २१व्या मिनिटास डॉयल अल्वेस याच्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आघाडी घेतली होती. त्यानंतर यंदा आय-लीगसाठी पात्रता मिळविलेल्या धेंपो क्लबने जोरदार मुसंडी मारत विजय साकारला.

गोव्यातील दोन्ही संघांना अगोदरच्या लढतीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले होते. एफसी गोवाने स्पोर्टिंग क्लबला ४-० फरकाने, तर ब्रिस्बेन रोअर एफसीने धेंपो क्लबला ५-१ फरकाने नमविले होते.

ब्रिस्बेनविरुद्ध धेंपो क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांना रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी संघ मैदानात उतरला, मात्र त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला नाही.

अ गटात अखेरच्या साखळी लढतीत आता स्पोर्टिंग क्लब द गोवासमोर ब्रिस्बेन रोअर एफसीचे आव्हान असेल, तर उपांत्य फेरीची आशा असलेला धेंपो क्लब एफसी गोवाविरुद्ध शेवटच्या सामन्यात खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT