Bandodkar Trophy 2024|FC Goa  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: एफसी गोवा आणि ओडिशात रंगणार अंतिम सामना! गतविजेत्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: उपांत्य लढतीत एफसी गोवाने अर्जेंटिनातील सीएसडी डिफेन्सा जस्टिसिया संघावर १-० अशी निसटती मात केली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात आर्मांदो सादिकू याने नोंदवलेल्या गोलच्या बळावर गतविजेत्या एफसी गोवाने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले. उपांत्य लढतीत त्यांनी अर्जेंटिनातील लढवय्या सीएसडी डिफेन्सा जस्टिसिया संघावर १-० अशी निसटती मात केली.

स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मंगळवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. दुसऱ्या उपांत्य लढतीत ओडिशा एफसीने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर एफसीवर २-१ फरकाने मात केली. ओडिशा एफसीचे दोन्ही गोल ह्युगो बोमोस याने नोंदविले. पूर्वार्धात विजयी संघ एका गोलने आघाडीवर होता. बोमोस याने पहिला गोल १६व्या, तर दुसरा गोल ६१व्या मिनिटास केला. ब्रिस्बेन रोअरने पिछाडी ६६व्या मिनिटास कमी केली. त्यांच्या थॉमस वॅडिंगहॅम याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल ठरला. एफसी गोवा व ओडिशा एफसी यांच्यातील अंतिम सामना शुक्रवारी खेळला जाईल.

मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ भारतीय संघात रुजू झाल्यामुळे साहाय्यक प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघ मंगळवारी मैदानात उतरला. तयारी सत्रात कार्ल मॅकह्यू जायबंदी झाल्यामुळे ऐनवेळी गतविजेत्या संघात बदल करावा लागला व मुहम्मद नेमिल याला सामावून घेण्यात आले. धेंपो क्लबविरुद्ध खेळलेल्या अखेरच्या साखळी सामन्यातील संघात पाच बदल करण्यात आले. ओडेई ओनाइंडिया, आकाश संगवान, रॉलिन बोर्जिस, ब्रायसन फर्नांडिस व देयान द्राझिच संघात दाखल झाले. अपेक्षेनुसार, डिफेन्सा जस्टिसिया संघाने आक्रमक खेळ करत एफसी गोवावर सुरवातीपासून दबाव टाकण्यास सुरवात केली. आयएसएल स्पर्धेसाठी सज्ज होणाऱ्या गोव्यातील संघाने सूत्रे निसटणार नाहीत याची दक्षता घेतली.

सादिकू याचा स्पर्धेतील चौथा गोल

३९व्या मिनिटास स्पर्धेतील चौथा गोल नोंदवत अल्बानियाच्या आर्मांदो सादिकू याने एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. बोरिस सिंग याच्याकडून उजव्या बगलेतून मिळालेल्या क्रॉसपासवर सादिकू याने गोलक्षेत्रात चेंडू छातीवर नियंत्रित केला आणि नंतर ताकदवान फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक गोन्झालेझ मॅक्झिमो याला संधीच दिली नाही. सामन्यातील काही मिनिटे बाकी असताना एफसी गोवाची चांगली संधी हुकली. यावेळी बोर्हा हेर्रेरा याचा प्रयत्न गोलरक्षक गोन्झालेझ याने वेळीच रोखल्यामुळे यजमान संघाची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT