BCCI T20 Womens Cricket Tournament 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI T20 Tournament: गोव्याच्या महिलांची हॅट्रिक! बलाढ्य मुंबईवर रोमहर्षक विजय; तेजस्विनीची फलंदाजी निर्णायक

Womens Cricket Tournament: तेजस्विनी दुर्गड हिच्या निर्णायक नाबाद फलंदाजीच्या बळावर गोव्याच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी सनसनाटी निकालाची नोंद केली. त्यांनी सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या मुंबईवर एक विकेट राखून रोमहर्षक विजय प्राप्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या महिलांचा बलाढ्य मुंबईवर रोमहर्षक विजय!BCCI T20 Womens Cricket Tournament 2024 Goa Vs Mumbai

पणजी: तेजस्विनी दुर्गड हिच्या निर्णायक नाबाद फलंदाजीच्या बळावर गोव्याच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी सनसनाटी निकालाची नोंद केली. त्यांनी सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या मुंबईवर एक विकेट राखून रोमहर्षक विजय प्राप्त केला. अ गट सामना बडोदा येथील कोटंबी स्टेडियमवर झाला.

गोव्याचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांनी जम्मू-काश्मीर व मिझोराम या तुलनेत कमजोर संघांवर मात केली होती. रविवारी बलाढ्य मुंबईला पराभूत करताना जबरदस्त जिगर प्रदर्शित केली. मुंबईने प्रथम फलंदाजी केली. गोव्याच्या नियंत्रित गोलंदाजीसमोर त्यांना निर्धारित २० षटकांत ९ बाद १११ धावाच करता आल्या. गोव्याने १८.३ षटकांत ९ बाद ११२ धावा करून सामना जिंकला.

उत्तरादाखल गोव्याची चांगलीच घसरगुंडी उडाली. तिसऱ्या क्रमांकावरील पूर्वजा वेर्लेकर हिच्या आक्रमक फलंदाजीनंतरही गोव्याची १३ षटकांत ९ बाद ८३ धावा अशी दाणादाण उडाली. फक्त एक विकेट बाकी असताना गोव्याला विजयासाठी बाकी सात षटकांत २९ धावांची गरज होती. तेजस्विनीने अखेरची बॅटर तनया नाईक (नाबाद ४) हिच्यासह यशस्वीपणे खिंड लढविली आणि गोव्याला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ३५ चेंडूंत पाच चौकारांसह तेजस्विनी ३३ धावांवर नाबाद राहिली. त्यापूर्वी, पूर्वजाने अवघ्या १९ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या होत्या.स्पर्धेतील गोव्याचा पुढील सामना २२ रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

मुंबई ः २० षटकांत ९ बाद १११ (सिमरन शेख ३१, एम. दक्षणी १०, साईमा ठाकोर २२, शिखा पांडे ४-०-२७-१, तरन्नुम पठाण ४-०-३०-०, प्रीती यादव ४-०-१७-२, सुनंदा येत्रेकर ४-०-१२-२, पूर्वा भाईडकर ४-०-२१-१) पराभूत वि. गोवा ः १८.३ षटकांत ९ बाद ११२ (संजुला नाईक १६, श्रेया परब ८, पूर्वजा वेर्लेकर ३२, तरन्नुम पठाण ०, शिखा पांडे ०, प्रीती यादव ५, पूर्वा भाईडकर ०, तेजस्विनी दुर्गड नाबाद ३३, विनवी गुरव ०, सुनंदा येत्रेकर १, तनया नाईक नाबाद ४, जाग्रवी पवार ४-०-२४-४, जान्हवी ४-१-२१-२, सनिका चाळके ४-०-१६-२)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT