पणजी: कर्नल सी. के. नायूड करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने उशिरा प्रतिकार केला, त्यामुळे ते एलिट क गट लढतीत गुरुवारी पराभव टाळू शकले नाहीत. बडोदा संघाने घसरगुंडीनंतर लक्ष्य गाठताना चार दिवसीय सामना चार विकेट्स राखून जिंकला.
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर सामना झाला. बडोद्यासमोर विजयासाठी २४५ धावांचे आव्हान होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी १ बाद १६६ धावा केल्या होत्या व विजयासाठी ७९ धावांची आवश्यकता होती.
गुरुवारी सकाळी अनुज यादव (४-६२) व दीप कसवणकर (२-५१) यांनी बडोद्याचा शतकवीर भविष्य पटेल (१३०) याच्यासह पाच विकेट्स २९ धावांत टिपल्या, त्यामुळे यजमान संघाचा डाव ६ बाद २३७ धावा असा गडगडला. अखेरचा त्यांनी ६ बाद २४५ धावा करून सामना जिंकला. बडोद्याला विजयाचे सहा गुण मिळाले. गोव्याचा गटातील पुढील सामना १९ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत बिहारविरुद्ध राजगीर येथे खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक : गोवा, पहिला डाव : ३२२ व दुसरा डाव : ९१ पराभूत वि. बडोदा, पहिला डाव : १६९ व दुसरा डाव (१ बाद १६६ वरून) : ५८.२ षटकांत ६ बाद २४५ (भविष्य पटेल १३०, आयुष राजगोर १७, हेनिल पटेल नाबाद १४, फरदीन खान ५-०-३१-०, राहुल विश्वकर्मा ८-१-५१-०, रुद्रेश शर्मा १२-०-४८-०, अनुज यादव १६-१-६२-४, दीप कसवणकर १७.२-५-५१-२).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.