Goa Badminton Competition Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Badminton: पैंगीणकर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी! निशांत, अर्जुन, श्रेया, जान्हवी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

Goa Badminton Competition: अनील पैंगीणकर स्मृती राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सीनियर पुरुष एकेरीत अव्वल मानांकित निशांत शेणई व अर्जुन रेहानी यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.

Sameer Panditrao

पणजी : अनील पैंगीणकर स्मृती राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सीनियर पुरुष एकेरीत अव्वल मानांकित निशांत शेणई व अर्जुन रेहानी यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. सीनियर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत श्रेया मेहता हिच्यासमोर जान्हवी महाले हिचे आव्हान आहे. स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात सुरू आहे.

कॅग गोवा कार्यालयात हल्ली रुजू झालेला अर्जुन रेहानी हा राष्ट्रीय मानांकनप्राप्त बॅडमिंटनपटू आहे. त्याने उपांत्य लढतीत सोहम नाईक याच्यावर वर्चस्व राखताना २१-१२, २१-९ असा विजय नोंदविला. निशांतने आगेकूच राखताना उपांत्य सामन्यात अर्जुन भगत याला २१-१९, २१-१९ फरकाने पराभूत केले.

महिलांच्या उपांत्य लढतीत सनसनाटी निकाल नोंदविताना श्रेया मेहता हिने स्पर्धेतील अव्वल मानांकित सुफिया शेख हिला चुरशीच्या लढतीत १३-२१, २१-१५, २१-१४ असे नमविले. दुखापतीतून सावरलेल्या जान्हवी महाले हिने शानदार पुनरागमन साधताना तृतीय मानांकित रितिका चेल्लुरी हिला २१-११, २१-१६ असे पराजित केले.

पुरुष दुहेरीत फळारी बंधू अर्जुन व तेजन यांनी अंतिम फेरी गाठताना मयांक राज व सी. के. शाहीन जोडीस २१-१५, २१-१७ असे हरविले. अर्जुन रेहानी व अयान शेख जोडीने अंतिम फेरीत स्थान मिळविताना आर्यमान सराफ व रुद्र फडते जोडीस २१-१७, १९-२१, २१-१४ असे नमविले.

मिश्र दुहेरीत अर्जुन रेहानी-यास्मिन शेख जोडी अंतिम लढतीत सनथ कामत-अनार सिंगबाळ जोडीविरुद्ध खेळेल. महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत अनार सिंगबाळ-अंजना कुमारी जोडीसमोर शिवांजली थिटे-सुफिया शेख जोडीचे आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरा ‘मास्टर माइंड’ मोकाट, अटक केलीये ते भाडोत्री गुंड! वेन्झींचे आरोप; गोवा बंद करण्याचा दिला इशारा

GST Rates: गोव्‍यात 117 दुकानांची प्रत्‍यक्ष पाहणी, विक्रेत्‍यांनी लावले फलक; जीएसटी कपातीच्‍या निर्णयाची होतेय अंमलबजावणी

Chorao Ferryboat: ..नदीत अचानक फेरीबोट पडली बंद! 2 तास खोळंबा; स्थानिक होड्यांच्या मदतीने प्रवाशांना आणले किनाऱ्यावर

Love Horoscope: सिंगल लोकांना मिळेल प्रेमाची साथ, आजचा दिवस तुमच्यासाठी खास! शुक्राच्या कृपेने होणार बदल; वाचा भविष्य

Damu Naik: 'प्रेम असते, तेथेच भांडण असते'! तवडकर- गावडे विषयावरती दामूंची प्रतिक्रिया; वाद संपल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT