Ajit Agarkar, Shubhman Gill Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Shubhman Gill Dropped: '..या कारणासाठी शुभमनला वगळले'! अजित आगरकरने सांगितले धक्कादायक कारण; उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे

T20 world cup 2026 india squad: कालपर्यंत उपकर्णधार असलेला आणि पर्यायाने संघातले स्थान जवळपास निश्चित असलेल्या शुभमन गिललाच वगळण्याचा धाडसी निर्णय निवड समितीने घेतला.

Sameer Panditrao

मुंबई: कालपर्यंत उपकर्णधार असलेला आणि पर्यायाने संघातले स्थान जवळपास निश्चित असलेल्या शुभमन गिललाच वगळण्याचा धाडसी निर्णय निवड समितीने घेतला. येत्या काही दिवसांत मायदेशात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून ईशान किशन आणि रिंकू सिंग या धडाकेबाज फलंदाजांना स्थान देण्यात आले आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १९) दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सामन्यात पराभव करून या मालिकेसह सलग आठ टी-२० मालिका जिंकणाऱ्या या संघात विश्वकरंडक स्पर्धेसाठी बदल होणार नाही, असे कालपर्यंत सर्वच जण सांगत होते; परंतु अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या निवड समितीच्या बैठकीत शुभमन गिललाच वगळण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उपकर्णधारपद अक्षर पटेल याच्याकडे देण्यात आले.

गिलला संघातून वगळले जाईल, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सलग दुसऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेस तो मुकणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार असलेला गिल या दोन्ही प्रकारांत सातत्याने धावा करत आहे; परंतु टी-२० प्रकारात त्याला अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. तरीही विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याला ऐनवेळी वगळले जाईल, अशी शक्यता नव्हती; परंतु निवड समितीने खेळाडूपेक्षा संघ हिताला प्राधान्य दिले.

शुभमन गिलच्या बॅटमधून मोठ्या धावा तर होत नव्हत्याच; परंतु त्याचा स्ट्राइक रेटही चिंता करणारा होता. आफ्रिकेविरुद्ध संपलेल्या मालिकेतील तीन सामने गिल खेळला आणि त्याला त्यात ४, ०, २८ धावाच करता आल्या होत्या. गिलकडून सध्या धावा होत नाही. तो गेल्या विश्वकरंडक स्पर्धेसही मुकला होता, आम्ही संघ निवड करताना संघ रचनेला (कॉम्बिनेशन) अधिक प्राधान्य दिले.

त्यात रचनेच गिल बसत नव्हता, म्हणून त्याला वगळण्यात आले, असे स्पष्टीकरण आगरकर यांनी दिली. दुसरीकडे देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा करणाऱ्या ईशान किशनसाठी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजीने ईशानने दोन दिवसांपूर्वीच आपल्या नेतृत्वपदी झारखंडला मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले. यात अंतिम सामन्यात त्याने वेगवान शतकी खेळी साकार केली होती.

अष्टपैलूंचा भरणा

या भारतीय संघात हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे असे वेगवान तर अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर असे दोन फिरकी गोलंदाज अष्टपैलू असतील.

संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक) आणि रिंकू सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

50 वर्षीय आरोपीचा 'मानसिक' बनाव फसला! POCSO न्यायालयाने जामीन फेटाळला; 'IPHB'ची कागदपत्रंही निरुपयोगी

Brahmin History: अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। ब्राह्मणी उपासना आणि सभ्यता

Goa Live News: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला भीषण आग

Theatre Tradition Goa: समृद्ध परंपरा लाभूनही, गोमंतकीय रंगभूमीला वर्तमानकाळात अनेक आव्हानांना सामोरे का जावे लागत आहे?

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

SCROLL FOR NEXT