Armando Sadiku X
गोंयचें खेळामळ

FC Goa च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आघाडीपटू सादिकू निलंबनमुक्त; पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध

Armando Sadiku: सादिकूची कृती जाणीवपूर्वक गंभीर चूक किंवा हिंसक नव्हती. या कारणास्तव सादिकूचे रेड कार्ड उलटवण्यात आले.

Sameer Panditrao

पणजी: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने एफसी गोवाचा आघाडीपटू आर्मांदो सादिकू याला निलंबनमुक्त करण्याचा निर्णय बुधवारी घेतला, त्यामुळे तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल.

एफसी गोवा व चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना शनिवारी (ता. २५) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. सध्या एफसी गोवाचे १६ सामन्यांतून ३० गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल स्थानावरील मोहन बागानपेक्षा (१७ सामन्यांतून ३७ गुण) त्यांचे सात गुण कमी आहेत. चेन्नईयीन एफसीचे १७ सामन्यांतून १८ गुण आहेत.

गेल्या रविवारी (ता. १९) फातोर्डा येथे ईस्ट बंगालविरुद्ध एफसी गोवाने १-० फरकाने विजय नोंदविला. त्या सामन्यात ९०+३व्या मिनिटास रेफरीने सादिकूला थेट रेड कार्ड दाखविले होते. त्यामुळे अल्बानियातील ३३ वर्षीय आघाडीपटू पुढील सामन्यासाठी निलंबित ठरला होता. या रेड कार्ड निर्णयाविरोधात एफसी गोवा संघाने एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे दाद मागितली होती.

त्यावर समितीने एफसी गोवास दिलासा देणारा निर्णय दिला. सादिकूची कृती जाणीवपूर्वक गंभीर चूक किंवा हिंसक नव्हती. या कारणास्तव सादिकूचे रेड कार्ड उलटवण्यात आले आणि यलो कार्डमध्ये (ताकीद) बदलण्यात आल्याची माहिती एफसी गोवातर्फे देण्यात आली.

सादिकू एफसी गोवाचा प्रमुख खेळाडू असून यंदा आयएसएलमधील १५ सामन्यांत त्याने नऊ गोल व दोन असिस्टची नोंद करून संघाच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT