Super Cup, FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

AFC League: FC Goa सनसनाटी निकालासाठी सज्ज! ‘अल झाव्रा’विरुद्ध रंगणार लढत; परदेशी खेळाडूंवर भिस्त

FC Goa vs Al Zawraa: एएफसी चँपियन्स लीग दोन फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविताना एफसी गोवाने प्ले-ऑफ लढतीत महिनाभरापूर्वी ओमानच्या अल सीब क्लबला पराभवाचा झटका दिला होता.

Sameer Panditrao

पणजी: एएफसी चँपियन्स लीग दोन फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविताना एफसी गोवाने प्ले-ऑफ लढतीत महिनाभरापूर्वी ओमानच्या अल सीब क्लबला पराभवाचा झटका दिला होता, आता फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरच मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आणखी एका सनसनाटी निकालासाठी सज्ज झाला आहे.

स्पर्धेच्या ‘ड’ गटातील एफसी गोवा व इराकचा अल झाव्रा क्लब यांच्यातील सामना बुधवारी (ता. १७) खेळला जाईल. त्यावेळी घरच्या मैदानावर जोरदार पाठिंब्याची अपेक्षा यजमान संघ बाळगून आहे.

पाठिराख्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी फातोर्डा येथेच १३ ऑगस्ट रोजी त्यांनी अल सीब क्लबला २-१ फरकाने हरविले होते. ‘ड’ गटात सौदी अरेबियातील अल नासर व ताजिकिस्तानचा इस्तिक्लोल एफसी हे अन्य प्रतिस्पर्धी आहे. या स्पर्धेपूर्वी मोसमात फक्त एकच स्पर्धात्मक सामना खेळलेल्या एफसी गोवाकडे गटातील ‘अंडर डॉग्ज’ संघ या नजरेने पाहिले जात आहे.

ताजिकिस्तानमध्ये झालेल्या काफा नेशन्स कप स्पर्धेत खेळताना भारताचा आंतरराष्ट्रीय बचावपटू संदेश झिंगन याला दुखापत झाली होती. तो बुधवारच्या सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. प्रशिक्षक मार्केझ सहाही परदेशी खेळाडूंवर जास्त अवलंबून राहतील.

डेव्हिड तिमोर, पॉल मोरेनो आणि हावी सिव्हेरियो यांनी पहिल्याच स्पर्धात्मक सामन्यात छाप पाडली होती. त्यांच्या अनुभवामुळे संघाला बळ मिळणार आहे. मध्यफळीवरील नियंत्रण, बचावफळीत भक्कमता आणि सेट-पीसमधील शिस्तबद्धता हे एफसी गोवाच्या खेळातील वैशिष्ट ठरू शकते. इकेर ग्वॉर्रोचेना, देयान द्राझिच, बोर्हा हेर्रेरा हे गतमोसमातील परदेशी खेळाडू मागील फॉर्म कायम राखण्यास इच्छुक असतील.

अल झाव्रा संघात नवे खेळाडू

अल झाव्रा संघाने नव्या मोसमासाठी तब्बल १२ नवीन खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक अब्दुल गनी शाहजाद यांची नेमणूक करून संघाचे पुनर्गठन केले. बगदादस्थित हा क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत परंपरा असलेला असून त्यांच्याकडे राष्ट्रीय संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक जलाल हसनसह आठ खेळाडू इराकतर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. ते आशियाई पातळीवरील प्रमुख स्पर्धेत सहाव्यांदा खेळत आहे. गतमोसमात इराकमधील लीग स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले.

दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धेत

एफसी गोवा संघ दुसऱ्यांदा आशियातील प्रमुख स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी एएफसी चँपियन्स लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्लब हा मान मिळविला होता. तेव्हा ई गटात त्यांनी सहापैकी तीन सामने बरोबरीत राखले होते. यावेळेस सुपर कप जिंकल्यानंतर प्ले-ऑफ लढत जिंकून एफसी गोवाने एएफसी चँपियन्स लीग दोन स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT