Goa U19 cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

Goa U19 cricket defeat against Puducherry: पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील पुरुष आंतरराज्य एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या आदित्य कोटा व मिहीर कुडाळकर यांनी झुंझार अर्धशतके केली, पण ते संघाचा मोठा पराभव टाळू शकले नाहीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील पुरुष आंतरराज्य एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या आदित्य कोटा व मिहीर कुडाळकर यांनी झुंझार अर्धशतके केली, पण ते संघाचा मोठा पराभव टाळू शकले नाहीत. यजमान पुदुचेरीने ११० धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला.

प्रथम फलंदाजी करताना आर. जिवितेशन (१०२ धावा, ११२ चेंडू, ८ चौकार व ४ षटकार) आणि आहिल कचरू (११८ धावा, १२१ चेंडू, १३ चौकार, ३ षटकार) यांच्या दणकेबाज शतकांच्या बळावर पुदुचेरीने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३४२ धावा केल्या.

नंतर गोव्याचा डाव २३२ धावांत संपुष्टात आला. सलामीच्या आदित्य कोटा याने ५५ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह ५४ धावा केल्या, तर तळात आक्रमक फलंदाजी करताना मिहीर कुडाळकरने ४० चेंडूंत पाच चौकार व चार षटकारांसह ६१ धावा नोंदविल्या.

संक्षिप्त धावफलक

पुदुचेरी ः ५० षटकांत ७ बाद ३४२ (आर. जिवितेशन १०२, आहिल कचरू ११८, नयन चोप्रा ४९, धर्मेंद्र कसाना २१, सृजन सिंहासन २१, गोविंद सावळ ९-०-९१-०, वेदांत डब्राल ८-१-४७-२, मिहीर कुडाळकर ९-०-४३-२, आफ्रिदसाब राजक्कनावर ८-०-२८-०, संचित नाईक ७-०-३९-०, जय कांगुरी ४-०-४८-०, मोहित यादव ५-०-४४-२) वि. वि.

गोवा ः ४३.१ षटकांत सर्वबाद २३२ (आदित्य कोटा ५४, विनीत कामत ३७, आफ्रिदसाब राजक्कनावर २०, आराध्य गोयल २२, मोहित यादव ७, वेदांत डब्राल १, साई नाईक १, मिहीर कुडाळकर ६१, गोविंद सावळ २, जय कांगुरी १४, संचित नाईक नाबाद ४, सृजन सिंहासन १-४८, एमकेएस हरिप्रसाद १-२६, देवांश तिवारी १-३९, पिंकू २-४९, नयन चोप्रा ६.१-०-४६-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT