Goa Police Transfers: पोलिस दलात मोठा फेरबदल; 789 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Goa Police Department Reshuffle: पोलिस खात्यामध्ये प्रशासकीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा फेरबदल करण्यात आला असून राज्यभरातील तब्बल ७८९ पोलिस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
Goa Police Transfers
Goa Police TransfersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोलिस खात्यामध्ये प्रशासकीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा फेरबदल करण्यात आला असून राज्यभरातील तब्बल ७८९ पोलिस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आस्थापन मंडळाच्या शिफारशीनुसार पोलिस महासंचालक कार्यालयाकडून हा आदेश जारी करण्यात आला असून सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या व्यापक फेरबदलामध्ये उपनिरीक्षकांपासून ते पोलिस शिपायांपर्यंतच्या सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक व महिला पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तसेच शेकडो पोलिस हवालदार आणि पोलिस कॉन्स्टेबल यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

Goa Police Transfers
Goa Private Forest Survey: खासगी वन सर्वेक्षण कामाला वेग, पुढील महिन्याअखेरपर्यंत अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता

बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जणांची रवानगी पणजी येथील राज्य पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली असून या विभागाला सर्वांत जास्त मनुष्यबळ मिळाले आहे. त्याशिवाय पणजी सुरक्षा विभाग, सरकारी राखीव दल, राज्यातील विविध वाहतूक कक्ष आणि किनारी सुरक्षा पोलिस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Goa Police Transfers
Goa Section 39A: कलम '39ए' चे भूत सत्ताधीशांच्या मानगुटीवर बसेल!

कार्यक्षमता वाढेल, अशी अपेक्षा वाढली

ताज्या बदल्यांमुळे अनेक पोलिस ठाण्यांतील मनुष्यबळाची नव्याने पुनर्रचना होणार असून, संवेदनशील भागांतील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात गतिमानता येण्याबरोबरच विविध विभागांमध्ये अनुभवाची देवाणघेवाण होण्यासही चालना मिळणार आहे. पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com