Aarush Pawaskar Goa Badminton Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Badminton: गोव्याच्या 'आरुष'ची रोमहर्षक मुसंडी! निर्णायक राउंडमध्ये विजय; 17 वर्षांखालील स्पर्धेत जोरदार आगेकूच

Aarush Pawaskar : गोव्याचा प्रतिभावान युवा बॅडमिंटनपटू आरुष पावसकर याने अखिल भारतीय सबज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत रोमहर्षक मुसंडी मारली.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचा प्रतिभावान युवा बॅडमिंटनपटू आरुष पावसकर याने अखिल भारतीय सबज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत रोमहर्षक मुसंडी मारली. अखेरच्या निर्णायक गेममध्ये खेळ उंचावत त्याने स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ फेरीत आंध्र प्रदेशच्या मंकू टाकू याला २१-१४, ९-२१, २१-१९ असे हरवून आगेकूच राखली.

स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरू आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीत आरुष याची स्पृहणीय कामगिरी वगळता गोव्याच्या अन्य खेळाडूंना पहिल्या फेरीचा टप्पा ओलांडता आला नाही.

१५ वर्षांखालील मिश्र दुहेरीत अर्णव सराफ व निहारिका परवार जोडीने झुंज दिली, परंतु त्यांना अखेरीस कर्नाटकच्या एडवर्ड ॲड्रियन व सुप्रिता दीपक जोडीकडून १८-२१, २१-१९, १६-२१ अशी हार पत्करावी लागली.

स्पर्धेच्या पात्रता फेरीत शानदार खेळ केलेल्या गोव्याच्या डिंपल रेवणकर हिची १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीतील आगेकूच खंडित झाली. तिला तेलंगणाच्या तनिष्का गांजी हिच्या साथीत विजया तेजस्विनी (आंध्र प्रदेश) व जोएल राणा (हरियाना) जोडीने २१-१२, २१-१७ असे सरळ गेम्समध्ये नमविले.

स्पर्धेच्या दोन्ही वयोगटात मानांकित खेळाडूंनी घोडदौड राखली. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित कर्नाटकचा पुष्कर साई, तृतीय मानांकित पंजाबचा वझीर सिंग, १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत अव्वल मानांकित शैना मणिमुथू, तृतीय मानांकित तेलंगणाची अवनी विक्रम यांनी विजयी कामगिरी साधली.

अवनी विक्रम हिला गुजरातच्या अन्वी पटेल हिने तीन गेम्समध्ये झुंजविले. १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत महाराष्ट्राचा अव्वल मानांकित देव रुपारेलिया व तेलंगणाचा तृतीय मानांकित अखिल रेड्डी यांना आगेकूच राखताना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

SCROLL FOR NEXT