World Introvert Day, meaning of introversion, introvert personality  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

Introvert Personality: अंतर्मुख असणे म्हणजे निव्वळ लाजाळू किंवा असमाजिक असणे नव्हे तर ते आपले ऊर्जा व्यवस्थापन योग्यरित्या सांभाळण्यासंबंधात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अंतर्मुख असणे म्हणजे निव्वळ लाजाळू किंवा असमाजिक असणे नव्हे तर ते आपले ऊर्जा व्यवस्थापन योग्यरित्या सांभाळण्यासंबंधात आहे. अंतर्मुख असण्याचा अर्थ हा आहे की, तुम्ही चांगल्या एकांतात आहात आणि शांततेतून ऊर्जा मिळवित आहात. 

आज जागतिक अंतर्मुख दिन! दरवर्षी गतवर्ष संपताना जो उत्सवी धूमधडाका सर्वत्र साजरा होतो, त्यातून थोडीशी शांतता आणि निवांतता मिळवण्यासाठी, २ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणारा जागतिक अंतर्मुख दिन हा विशेष संयुक्तिक आहे यात शंका नाही. या आजच्या दिवशी आपल्या भोवतालच्या अनेक अंतर्मुख लोकांना आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. 

अनेकदा अंतर्मुखता हा कमकुवतपणा आहे, असे मानले जाते; पण ती एक शक्ती आहे हे हा दिवस भर देऊन सांगतो. समाजातील अंतर्मुखी विचारवंतांच्या मौल्यवान योगदानावर प्रकाश टाकणारा हा दिवस, अंतर्मुखता हा मानवतेच्या सर्वांत मोठ्या गुणांपैकी एक आहे, जी व्यक्तीला बळकट बनवण्यास, तिची सर्जनशीलता जोपासण्यास आणि वैयक्तिक विकासाला चालना देण्यास पाठबळ देते हे उद्घोष करून सांगतो. 

भारतीय तत्त्वज्ञानात अंतर्मुखता ही एक व्यापक संकल्पना आहे. बाह्य जगाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचा, चेतनेचा शोध घेणे हा तर भारतीय तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू मानला गेला आहे. योग, वेदांत बौद्ध आणि जैन दर्शनांमध्ये ध्यान आणि आत्मनिरीक्षण ही आंतरिक शांतता आणि मानसिक स्थिरता मिळवणारी साधने मानली गेली आहेत.

आधुनिक मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानही हेच सांगते की आपल्या विचारांचे, भावनांचे आणि कृतींचे विश्लेषण करण्यात एक प्रकारचे विरेचन होऊ शकते. आधुनिक काळातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ कार्ल जुंग लिहितो, ‘प्रत्येक व्यक्ती दोन गटात मोडते- अंतर्मुखी किंवा बहिर्मुखी. अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता अपोलोसारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात.’ तुम्ही अंतर्मुख असा वा बहिर्मुख, सातत्याने विचलित करणाऱ्या आजच्या जगात डोके शांत राखण्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी आजचा हा दिवस परिपूर्ण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT