Sunburn Festival 2024 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: बहुपदरी विरोध

Goa Opinion: ‘फूट पाडा आणि राज्य करा’, ही इंग्रजांनी चपखलपणे वापरात आणलेली नीती आजही प्रभावी अस्त्र आहे, हे सनबर्नला विरोध आणि समर्थनार्थ झालेल्या सभांनी दाखवून दिले. विरोधकांसमोर उभे ठाकलेले समर्थक पाहून भविष्यात तालुक्यात जुगारसदृश उद्योग उभारणाऱ्या घटकांच्या मनात नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील.

गोमन्तक डिजिटल टीम

‘फूट पाडा आणि राज्य करा’, ही इंग्रजांनी चपखलपणे वापरात आणलेली नीती आजही प्रभावी अस्त्र आहे, हे सनबर्नला विरोध आणि समर्थनार्थ झालेल्या सभांनी दाखवून दिले. विरोधकांसमोर उभे ठाकलेले समर्थक पाहून भविष्यात तालुक्यात जुगारसदृश उद्योग उभारणाऱ्या घटकांच्या मनात नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील.

पेडणेकरांना हवे तसे हाताळता येऊ शकते, असा विश्वास अधिक दृढ झाल्यास त्यात नवल नसावे. मांद्रेतील जीत आरोलकर समर्थकांनी सनबर्नची भलावण केली. आयोजनाआधी कल्पना दिली नसल्याने आमदार आर्लेकर यांचा अहंकार कमालीचा दुखावला गेला आहे. त्यांनी विरोधासाठी गर्दी जमवली. सनबर्नच्या मुद्याला राजकीय रंग चढलाय, ज्यात पेडणेवासीयांची फरफटच होईल. जिथे प्रकल्प होऊ घातला आहे, त्या धारगळमधील लोकांचा आवाज किती होता, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांना काय वाटते हे ठळकपणे समोर आलेले नाही.

विरोध वा समर्थक हे तालुक्यातील; परंतु त्यात धारगळचे रहिवासी किती! बहुतेकांना सनबर्न म्हणजे काय, हे माहीतही नसावे. आज होणाऱ्या पंचायतीच्या निर्णयावर पुढील सोपस्कार तेवढे पार पडतील. सनबर्न आयोजकांना तशी खात्रीही असेल. वैषम्य याचेच की, कळीच्या मुद्यांवर ‘गोंयकार’ एकामेकांविरोधात उभे राहत आहेत. हणजूण पंचायतीत ध्वनिप्रदूषणाला विरोध केल्याने तरुणाला झालेली मारहाण ही त्याची नांदी.

‘मोपा’मध्ये विमानतळ नको, असा राज्यभरातून सूर उमटला असताना पेडणेवासीयांनी पाठिंबा दर्शविला होता. आता तेच पेडणेवासीय ‘मोपा’मुळे कसे नुकसान झाले, याचा पाढा वाचत आहेत. काय बरे आणि काय वाईट याची पारख करण्याची कुवत आणि निर्णय घेण्यासाठी एकी नसल्यास विश्वासार्हताही रसातळाला जाते. सरकारला असे ईडीएम आयोजित करायचे असल्यास त्यात वावगे नाही. परंतु ताकाला जाऊन भांडे लपवू नका. लोकांना आपसात झुंजवू नका.

पर्यटनासाठी पूरक ठरणाऱ्या सनबर्नसारख्या महोत्सवांचा साकल्याने विचार करून एकदा काय ते ठोस धोरण ठरवा. लोकांना लोकांविरुद्ध उभे करण्यामागे अनेक पदर आहेत. याचे काहीही दुष्परिणाम झाले तर ‘लोकांची मागणी’ या पदराखाली दडता येते. ‘लोकांचा विरोध’ हाही एक असाच पदर ज्याआड राज्यकर्त्यांना स्वत:चे उखळ पांढरे करून घेता येते. जेवढा जास्त विरोध तेवढा तो शमवण्यात जास्त ‘अर्थ’.

दोन्ही बाजूंनी स्वत:चा लाभ करून घेणे गोमंतकीय राजकारण्यांना छान जमते. स्वातंत्र्याचा मर्यादित अर्थ राजकीय सत्ताहस्तांतरण एवढ्यापुरताच उरला आहे. ‘गोरे गेले, काळे आले’; फूट पाडून राज्य करणे तसेच राहिले. गोवेकरांनीच गोवेकरांची माथी किती काळ फोडत राहायची याचा विचार डोके शांत ठेवून करण्याची वेळ आली आहे. विरोधाचे आणि समर्थनाचे ओझे वाहणाऱ्या पेडणेकरांच्या धडांवर त्यांचे स्वत:चेच डोके आहे की अन्य कुणाचे याचाही विचार व्हावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT