विद्यार्थी समूहाने बाहेर पडले आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाचा केंद्रबिंदू अन्याय. पेपरफुटी, चाटे ते लातूर पॅटर्न, अग्रवाल, राव अकादमीपर्यंत सतत आवाज उठवत होते. पण तेवढ्याच शक्तीने प्रकरण दाबले गेले. ‘नीट’च कौतुक का, असा प्रश्न पडला ? अदृष्य असा मोहळ विषय कसा पुढे न्यावा हा विचार करत होता. त्यात एक युवक उभा राहिला. मानसिकता, मूल्य हा विचार घेऊन क्रांती घडवायला इतरही सरसावले. नाव ठरले ‘कॅाकरोज’. त्याला प्रतिसाद मिळू लागला. ते कुणाचेच हितशत्रू नव्हते, मत्सरग्रस्त नव्हते. व्यवस्था, व्यवहार ह्यांचा विरोध करत होते. आत्महत्या केलेल्या मुला-मुलींबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे, मग मी त्यांना मायाळू, बुद्धिमान, अभ्यासू म्हणते. दुसऱ्यांना जाणून घ्यायला तरूणाई पुढे आली.
‘जेन-झीं’नी अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न पाहिले, ज्यावर त्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. ढीगभर प्रश्न पण व्यवस्थेकडून मुळमुळीत उत्तर. तोडगा काढण्यासाठी नवीन धोरण नाही, उपाय योजना अशांत तरूण नेतृत्व वास्तवाची जाणीव घेऊन भारतीय युवक उतरला. एका सामान्य घरातील व्यक्ती कर्ज काढून शिक्षणासाठी परदेशात गेला. त्याची व्यथा ‘नीट’ परीक्षा नसली तरी क्षेत्र शिक्षण होते. पूर्व राजकारणात राष्ट्र घडवण्यासाठी परदेशात शिक्षण घेऊन अनेकजण स्वातंत्र्यासाठी लढले. ते विषय वेगळे होते. पण तो विषय मला लागत नाही, म्हणून पळून गेले नाहीत. पत्रकारितेचे शिक्षण जो समाज घडवायला शिकत आहे, त्याला सर्व विषय तितकेच महत्त्वाचे. संवेदनशील पदरी पडणारे अपयश, परिस्थितीशी झुंज पाहून त्याने हे पाऊल उचलले. मंजूर, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, सरकारी अधिकारी ते नोकरदार या सर्वच मुलांना समजून घेऊन जरा उशिरा का होईना, आंदोलनाचे स्वरूप ठरवले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक हिस्सा सुरू झाला, नि व्यवस्थेला धक्का दिला.
आंदोलनाचे पेव पसरले. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला. सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलक शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागत होते. मात्र टप्प्याटप्प्याने आंदोलन शांत होईल, असे समजून काहीजण वेळीच द्वेष पसरवत जात, धर्म आणि संस्कृती धोक्यात आणू पाहत आहेत, असे वक्तव्य व्हिडिओ प्रसारित करत होते. गंभीर आरोप, प्रत्यारोप, जुनाट गोष्टी काढून त्यांच्यावर टीका केली गेली. अतिशय उद्विग्न मनःस्थिती असतानाही आंदोलन ‘आजादी’, न्याय शोधत होते. २१ दिवस होऊनही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नव्हत्या. निवेदने कचऱ्यात पडत होती.
स्पर्धेच्या युगात पुढाऱ्यांच्या ओळखी थिट्या पडल्या. आमिषं लुळी पडताच तडजोड न करता चडफड सतावत होती. मुलांना कोंडीत पकडून त्यांना नाउमेद करायचे तर वातावरण निर्मिती करायची, हे तंत्रही वापरले गेले. आंदोलक नेते उपोषण सोडायचे नाव घेत नव्हते. आधारस्तंभ विकत घेता येत नव्हता. संघर्ष चालूच. प्रवाहाबरोबर जावे परीक्षा परत घ्यावी, त्यासाठी घेतल्या गेल्या. प्रवाहाविरुद्ध जाऊन उगम शोधत पोलिसांचा (Police) बडगा उगारला. त्यामुळे काही नवी बीज पेरली गेली, या शिक्षण पद्धतीत व्यवहार, पेपर घेतल्याचा दिखावा ठळकपणे समोर आला. कुठे, कसा व्यवहार असेल राजीनामा का दिला जात नाही, हा उथळपणा पटत नव्हता.
पूर्वी आपला पदभार सांभाळताना दुर्घटना घडली की, मंत्री पद सोडून राजीनामा देत असा अलिखित करार होता. मग आता तो कमीपणा का वाटतो?. जनतेने निवडून दिलेल्या मंत्र्यांना घेराव घालून निवडून दिला नव्हता. विरोध केला तर आक्षेप का? आजची पिढी जाणीवेतून विवेक, तत्त्व सांभाळत आहे. भ्रष्टाचार समूळ संपणार नाही, निदान खाते बदला. तरूण मरगळ झटकून पुढे आलेत. झपाट्याने जंतरमंतर वर गर्दी वाढली. मुंबई, पुणे, जयपूर, गुजरात, गोवा सीमा पार करून शांतपणे प्रवास सुरू झाला. पोलिसांनी अश्रुधूर सोडून रानटीपणात भर घातली. मुलांचे आक्रोश, अत्याचार, मारहाण निदर्शनास आली. खरंच पोलिसांना नैतिक अधिकार आहे का? इथे मोठे कोण झाले, सोनम वांगचुक, अभिजीत दिपके ते प्रामाणिक ठरले. आता मुर्दाबाद कोण? स्टुडंस पॅावर मोठी, की नॅशनल पॅावर..
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.