नुकत्याच झालेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या दोन घटनांमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. त्यातील एका प्रसंगात तर 19 महिन्यांच्या चिमुरडीला मृत्यु पत्करावा लागला. गेल्या महिन्यातील काही घटना पाहता गोव्यातील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करणे आता शक्य नाही. त्याचबरोबर कुत्र्यांना नामशेष करणे हे मानवतेचे लक्षण नाही. मग या वाढत्या समस्येवर उपाय काय?
अनेक भटक्या कुत्र्यांना पाळीव प्राणी मालक ती पिल्लाच्या अवस्थेत असताना सोडून देत असतात आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक भटक्या कुत्र्यांना खायला घालू लागले आहेत. त्यामुळे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण मोहीम या पलीकडे जाणार्या पद्धतशीर योजनेची आता आवश्यकता आहे, ज्यामध्ये राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा तसेच लोकांचा समावेश असेल.
मांडवी नदीच्या कडेने मी नेहमी चालायला जातो. या मार्गावर एके काळी एकही भटके जनावर दिसत नसे. एके दिवशी, सुमारे दोन वर्षांपूर्वी अचानक मला तिथे कुत्र्याची पिल्ले दिसली. त्या पिल्लांसोबत दुसरा एकही कुत्रा नव्हता त्यामुळे हे स्पष्ट होतं ते की त्या पिलांना कुणीतरी तिथे सोडून दिले होते. आता कालांतराने या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसते. प्राणीप्रेमी त्यांना नेहमी खायला देताना दिसतात आणि त्यांची संख्याही वाढताना दिसते.
पाळीव प्राण्याची ‘जबाबदारीची/मालकी’ ही गोष्ट आम्ही आता विचारात घेतली पाहिजे, त्यानुसार कुत्र्यांच्या मालकांना, त्यांच्या पाळीव प्राण्यांना योग्य निगराणीशिवाय भटकायला देण्यावर बंदी आणली पाहिजे. दुसऱ्या देशात कुत्र्यांच्या मालकांना कुत्र्यांनी केलेली घाण स्वच्छ करणे अनिवार्य असते. गोव्यात कोणी असे कधी करेल काय? जर प्राण्यांचे मालक त्यांच्या प्राण्यांसाठी जबाबदार नसतील तर त्यांना किमान याची जाणीव करून दिली पाहिजे की ते त्यांना सार्वजनिक ठिकाणी टाकून जाऊ शकत नाहीत. अशामुळे प्राणी कल्याण संस्था करत असलेल्या कामावर पाणी फेरले जाते. विशेष म्हणजे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (i) मध्ये म्हटले गेले आहे की कोणत्याही प्राण्याला उपासमार किंवा तहानेमुळे त्रास होतील अशा परिस्थितीत सोडून देणे हे प्राणी क्रौर्यतेचे प्रमाण आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्यासाठी निवारागृहे तयार करणेही कठीण बनले आहे. निवारागृहांचे व्यवस्थापन करणे हे सगळ्यात मोठे आव्हान असते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांना त्यातील काही कुत्रे आपल्याकडे नेऊन, त्यांची देखरेख करणे शक्य होईल काय? पाळीव प्राण्यांच्या काळजीपोटी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ते हे करू शकतात. भटक्या कुत्र्यांच्या कळपातील कुत्र्यांची संख्या कमी करणे हा देखील सुचवला गेलेला एक उपाय आहे. कळपातील कुत्र्यांची संख्या जितकी जास्त असते तितकी ते हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. भटक्या कुत्र्यांना विशिष्ट ठिकाणी भरपूर अन्न खाऊ घातल्यामुळे कुत्र्यांच्या कळपातील कुत्र्यांची संख्या वाढत जात असते हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कुठलाही सोपा उपाय नाही हे नक्की.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.