School Discipline Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

school : शाळेत शिस्त लावणाऱ्यांनाही भान असायचं, की हे कुणाच्या काळजाचे तुकडे आहेत. कच्ची मडकी आहेत ही त्यांना योग्य वळण लावण्यासाठी आपण इथं आहोत.

Sameer Amunekar

शाळेत शिस्त लावणाऱ्यांनाही भान असायचं, की हे कुणाच्या काळजाचे तुकडे आहेत. कच्ची मडकी आहेत ही त्यांना योग्य वळण लावण्यासाठी आपण इथं आहोत.

‘ही कार्टी म्हंजी नुस्ता उच्छाद हैत.” वर्गाबाहेरच्या व्हरांड्यात आम्ही पहिलीतल्या मुली इतका आरडाओरडा करत खेळायचो, की रस्त्याच्या पलीकडे असलेल्या बँकेपर्यंत आमचा गोंधळ ऐकू जायचा. त्यावेळी साधा पंखा असायची मारामार, एसी कुठला असायला बँकेत! सगळी दारं-खिडक्या सताड उघडी. आमचा गलका एकेकदा इतका वाढायचा, की बँकेतला कारकून हेडबाईंना सांगायला यायचा, ‘आवरा पोरींना!’

हेडबाई मग खाली घातलेली मान वर करून टेबलाच्या रजिस्टरमध्ये नोंदी करता करता सांगायच्या, ‘जा गं. पोरींना जरा बसव वर्गात.’ मग शाळेत झाडू मारणारी म्हातारी रुक्मिणी कमरेवर एक हात ठेवून तरातरा आमच्याकडे यायची. ‘चला साऱ्याजणी आत वर्गात बसा. मांडी घाला. तोंडावर बोट ठेवून हाताची एक घडी घाला.’

तिच्या कावळ्यासारख्या ओरड्यानं आम्ही घाबरून गपचूप वर्गातल्या फळ्यासमोर ओळीनं बसायचो. मग रुक्मिणी ओळीने सगळ्यांच्या पाठीत एकेक धपाटा घालत जायची. म्हातारी असली तरी चांगलीच ताकद होती तिच्या हातात. अंग चोरून मुकाट्यानं आम्ही तिचे रट्टे खायचो, कळवळायचो. पण काय बिशाद घरी तक्रार करायची? वरून घरच्यांकडून कुचकुचीत चिमटे मिळायचे.पुढे थोडी मोठी झाल्यावर आम्हांला मस्ती केली तर बाई उघड्या पायांवर पट्ट्या मारायच्या.

हायस्कूलमधले सर तर भला मोठा रूळ टेबलावर ठेवायचे. होमवर्क केला नसेल तर एकेकाची टाळकी फोडून टाकतो म्हणायचे. कधी कुणाचं टाळकं फोडलं नाही. पण आम्ही तो रुळ बघूनच टरकून जायचो. माराच्या भीतीने का होईना, पण फार सिरियसली नाही केला तरी रडतमरत होमवर्क करून टाकायचो. आमचे हेडमास्तर तर शाळेत उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना गेटवरच छडीचा चोप द्यायचे. गावातले लोक येत जात असायचे. कुणीच तक्रार केली नाही. ना विद्यार्थ्यांच्या पालकांनी, ना विद्यार्थ्यांनी!

एखाद दुसरा वळ कधीतरी हातापायावर उठायचा. पण तेवढंच घरी जाईतोवर तो वेळ जावा म्हणून आम्ही तिथं पाणी लावून चोळत बसायचो. हायस्कूलमधले सर मनावर शाब्दिक वळ उठेल याची दक्षता घ्यायचे. या सगळ्यांचा परिणाम व्हायचा की शाळेचे रिझल्ट उत्कृष्ट लागायचे.

आम्हा विद्यार्थ्यांना पक्कं माहीत असायचं की आमचं चुकतंय कुठेतरी; म्हणून रुक्मिणीबाई, सर किंवा हेडमास्तर आम्हाला मारतात. आम्ही चांगले विद्यार्थी, चांगली माणसे व्हावे म्हणून आमच्यावरच्या प्रेमापोटी, काळजीपोटी ते आम्हांला शिक्षा करतात. ही शिस्त लावण्याची एक पद्धत आहे. घरच्यांनाही विश्वास असायचा आपली मुलं शाळेत शिक्षकांच्या हाती सुरक्षित आहेत.

शाळेत शिस्त लावणाऱ्यांनाही भान असायचं, की हे कुणाच्या काळजाचे तुकडे आहेत. कच्ची मडकी आहेत ही त्यांना योग्य वळण लावण्यासाठी आपण इथं आहोत. ती मुलं आहेत; त्यांना गुराख्यासारखी, गुलामांसारखी मारझोड करणं, बडवणं योग्य नाही.

एकमेकांबद्दल आपुलकी असायची. शिक्षकांबद्दल आदर असायचा. रुक्मिणीसारखी अशिक्षित झाडूवालीसुद्धा हे भान बाळगायची.मग आताच हे अधूनमधून वळ येण्याइतकं मारणं आणि पोलिसांपर्यंत तक्रारी असं का होतंय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT